शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर राज्य सरकार विकत घेणार

By admin | Updated: September 11, 2014 10:09 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथे शिक्षण घेत असताना ज्या घरात वास्तव्य केले होते ती ऐतिहासिक वास्तू विकत घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथे शिक्षण घेत असताना ज्या घरात वास्तव्य केले होते ती ऐतिहासिक वास्तू विकत घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. लंडनमधील किंग हॅनरी रोड येथे असलेल्या या घराची किंमत सुमारे ४० कोटी रुपये असून यासंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारकडेही मंजूरी मागितली आहे. 
भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि अस्पृश्यांच्या न्यायासाठी लढा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १९२१ -२२ दरम्यान लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण घेत होते. या कालावधीत बाबासाहेबांनी लंडनमधील किंग हेनरी रोड येथील एका घरात वास्तव्य केले होते. या ऐतिहासिक वास्तूची विक्री होणार असून त्यासंदर्भातील जाहिरातही लंडनमधील वृत्तपत्रांमध्ये झळकली होती. हा प्रकार लंडनमध्ये कार्यरत असलेल्या फेडरेशेन ऑफ आंबेडकराईट्स अँड बुद्धिस्ट ऑर्गेनायझेशन (FABU) या संघटनेच्या सदस्यांनी महाराष्ट्र सरकारच्या निदर्शनास आणून दिला. लंडनमधील लोकांच्या दृष्टीने हे फक्त एक घर असले तरी महाराष्ट्रासाठी ती एक ऐतिहासिक जागा आहे. यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती जलसंवर्धन मंत्री नितीन राऊत यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट जगासमोर मांडण्यासाठी नागपूरमध्ये कन्व्हेन्शन सेंटरसाठी सुमारे १३० कोटी रुपयांचा निधी दिला. मग लंडनमधील बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या घरासाठी ४० कोटी रुपये ही फारच कमी रक्कम आहे. त्यामुळे हे घर विकत घेण्यास राज्य सरकारला कोणतीही आर्थिक अडचण नसून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही याला मंजूरी दिली आहे. परदेशातील वास्तू असल्याने यासाठी  केंद्र सरकारकडून हिरवा कंदील कधी मिळतो याची राज्य सरकारला प्रतिक्षा आहे. राज्य सरकारने मुंबईतील ब्रिटन उच्चायुक्तांनाही यासंदर्भात पत्र पाठवले आहे.