शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 08:14 IST

बालपणापासूनच अजय यांची सहावी ते बारावीपर्यंत अजयने प्रथम क्रमांक कधी सोडला नाही

हुसेन मेमन 

जव्हार : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या जव्हार तालुक्यातील पहिले कोगदे या गावातील डॉ. अजय काशीराम डोके यांनी यूपीएससी परीक्षेत ३६४ वा रैंक मिळविला आहे. आदिवासी भागातून यूपीएससी परीक्षेत यश मिळवणारे डॉ. अजय डोके हे पहिलेच युवक ठरले आहेत. विशेष म्हणजे इंटरनेटवरील व्हिडीओच्या माध्यमातून अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले. मोबाइलचा योग्य कामासाठी वापर करून अशा परीक्षांत यश मिळवावे, असा सल्ला डॉ. अजय यांनी दिला.

डॉ. अजय यांच्या या यशात वडील काशीराम व त्यांच्या कुटुंबाचा वाटा आहे. बालपणापासूनच अजय यांची सहावी ते बारावीपर्यंत अजयने प्रथम क्रमांक कधी सोडला नाही. पुढे बारावी विज्ञान शाखेत यश मिळवून के.ई.एम. वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथून एमबीबीएससाठी प्रवेश घेऊन त्यांनी पदवी संपादन केली.

यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्यांना एवढेच सांगू इच्छितो की, आज कोणत्याही प्रकारचे क्लास न लावताही केवळ इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास करू शकतो. आपल्या ग्रामीण भागातील मुलांनीही मोबाइल, लॅपटॉपचा योग्य वापर केला, तर कमी खर्चात गरीब मुलांनाही यूपीएससी पास होणे अशक्य नाही -  डॉ. अजय डोके, जव्हार

मुलुंडची अंकिता पाटील ३०३ व्या क्रमांकावर

यूपीएससी परीक्षेत मुलुंडच्या अंकिता पाटील हिने ३०३ वा क्रमांक मिळवला आहे. मेहनत, सातत्य, सुनियोजन या बळावर अंकिताने हे यश मिळवल्याचे सांगितले. प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांची ती कन्या आहे. अंकिता महाराष्ट्रातून दुसरी आली आहे. तिने प्रथम आयएएसला प्राधान्य दिले आहे. अंकिताचे शालेय शिक्षण हे भांडुप येथील पवार पब्लिक स्कूल येथे झाले. शालेय शिक्षणानंतर तिने अभियांत्रिकी शिक्षण घेतले. त्यानंतर तिने एक वर्षे नोकरी केल्यानंतर तिने यूपीएससीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. वडील सिव्हिल सर्व्हिसमध्ये असल्याने या क्षेत्रात येण्याची आवड निर्माण झाल्याचे तिने सांगितले. २०२२ मध्ये तिने यूपीएससीची तयारी केली. तिसऱ्या प्रयत्नात तिला यश प्राप्त झाले.रोज आठ ते दहा तास अभ्यासरोज आठ ते दहा तास अभ्यास केला. आहाराचे नियम पाळले. मी क्रीडा क्षेत्रातील असल्याने खेळालाही तितकेच महत्त्व दिले. जे वर्तमानपत्र वाचनासाठी निवडले होते तेच शेवटपर्यंत वाचत राहिले. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत मेन्सच्यावेळी प्रवेश घेतला आणि मॉक टेस्ट दिल्या. त्याचप्रमाणे रिव्हिजनवर जास्त भर दिला. वडिलांप्रमाणे आईचादेखील पाठिंबा होता. ती सतत माझ्या पाठीशी होती. मेहनत केली त्याचे चीज झाले, असे अंकिताने सांगितले.

करिअरचे नवे दालन...मेहनत, सातत्य व सुनियोजित प्रयत्नांतून या परीक्षेत यश मिळवता येते. वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो. पण त्याचबरोबर यूपीएससीची परीक्षा दिली तर करिअरचे नवे दालन उघडू शकते, असे अंकिता म्हणाली. आयएएस अधिकारी होऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याची तिची इच्छा आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी