शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा इतिहास जतनासाठी १ कोटीची देणगी; कर्नाटकातील मुरकुंबी कुटुंबाचे दातृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 05:55 IST

मराठा साम्राज्याचा देदीप्यमान इतिहास सर्वांसाठी खुला व्हावा, यासाठी कर्नाटकातील एक मराठी उद्योजक पुढे आले आहेत.

- राजू इनामदारपुणे : मराठा साम्राज्याचा देदीप्यमान इतिहास सर्वांसाठी खुला व्हावा, यासाठी कर्नाटकातील एक मराठी उद्योजक पुढे आले आहेत. त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाला तब्बल एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यातील ३५ लाख रुपयांच्या प्रकल्पाचे काम सुरूही झाले आहे. भारत इतिहास संशोधन मंडळातील १० लाखांपेक्षाही अधिक कागदपत्रांचे यात डिजिटायझेशन होईल, ती संकेतस्थळावरून सर्वांसाठी खुली होतील, त्यांचे लिप्यंतर होऊन ती सामान्य वाचकांनाही उपलब्ध होतील. दोन वर्षांच्या या प्रकल्पाला नरेंद्र मुरकुंबी यांच्या देणगीतून विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली.मुरकुंबी कुटुंब मूळचे मराठी. मात्र, अनेक वर्षांपासून कर्नाटकात स्थायिक झाले आहे. नरेंद्र यांच्या आई विद्याताई यांना मराठी साम्राज्याच्या इतिहासाची आवड. नरेंद्र यांच्यातही ती आली.  मुरकुंबी म्हणाले, १६३० ते थेट १८१८ हा या काळातील महाराष्ट्राचा इतिहास झपाटून टाकणारा आहे. त्यासंबंधीची असंख्य कागदपत्रे अजूनही अप्रकाशित आहेत. मंडळात अशी १० लाखांपेक्षाही अधिक कागदपत्रे असल्याचे समजले. जगासमोर हे सर्व आणण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ते सहज शक्य आहे. त्यातून नवे संशोधक तयार व्हावेत, असे अपेक्षित आहे.नव्या पिढीला होईल इतिहास माहितीभांडारकर इन्स्टिट्यूट यांनी माफक शुल्क आकारून यासाठी दोन मोठे स्कॅनर दिले. अर्थसाहाय्याचे आणखी हात पुढे येतील. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यासाठीही प्रयत्न होत आहेत. वैभवशाली मराठा साम्राज्याच्या इतिहासाची नव्या पिढीला माहिती व्हावी, या अंत:प्रेरणेने उपक्रमाला सुरुवात केली असून या कामाला लवकरच गती मिळेल, असा विश्वास नरेंद्र मुरकुंबी यांनी व्यक्त केला.