भाडं नाकारलं म्हणून डोंबिवलीत रिक्षाचालकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2015 12:24 IST2015-07-25T12:20:52+5:302015-07-25T12:24:23+5:30

भाडं नाकारल्याच्या रागातून चौघांनी रिक्षा चालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील नांदिवली परिसरात घडली.

Dombivli rickshaw driver killed after refusing the rent | भाडं नाकारलं म्हणून डोंबिवलीत रिक्षाचालकाची हत्या

भाडं नाकारलं म्हणून डोंबिवलीत रिक्षाचालकाची हत्या

 ऑनलाइन लोकमत

डोंबिवली, दि. २५ - भाडं नाकारल्याच्या रागातून चौघांनी रिक्षा चालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. शहरातील नांदिवली परिसरात हा प्रकार घडला असून चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चारही आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते, काल मध्यरात्रीच्या सुमारार त्यांनी नांदिवली परिसरात एक रिक्षा थांबवली, मात्र खूप उशीर झाल्याने रिक्षाचालकाने भाडं घेण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या चारही जणांनी त्या रिक्षाचालकावर दारूच्या बाटलीनेच वार करून त्याची हत्या केली व त्याचा मृतदेह निर्जन स्थळी फेकून दिला.शुद्धीवर आल्यावर चार आरोपींपैकी एकानेच पोलिसांकडे गुन्ह्याची कबूली दिली आणि पोलिसांनी मृतदेह शोधला. चालकाच्या शरीरावर तब्बल ४३ वार आढळून आले आहेत.

Web Title: Dombivli rickshaw driver killed after refusing the rent