शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना विसरलात का?

By admin | Updated: October 8, 2014 21:48 IST

वषार्नंतरही मारेकरी सापडत नाहीत, हे सगळ्याच पक्षांनी नजरेआड केले आहे.

राजीव मुळ्ये - सातारा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा, अयशस्वी तपासाचा आणि जादूटोणाविरोधी कायद्याचा निवडणूककाळात सर्वच पक्षांना विसर पडला आहे का, असा उद्विग्न सवाल दाभोलकर कुटुंबीयांनी केला आहे. चांगले काम म्हणून सत्ताधारी जादूटोणाविरोधी कायद्याचा उल्लेख जाहिरातीत करीत नाहीत आणि विरोधक कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा म्हणूनसुद्धा हा प्रश्न उचलत नाहीत, याबद्दल कुटुंबीयांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘राजकीय पक्षांचे प्रचाराचे मुद्दे पाहिले असता, ते गंभीरपणे का घ्यावेत, असा प्रश्न मतदारांना पडतो,’ असे निरीक्षण एक नागरिक म्हणून नोंदवून मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, ‘राज्याची प्रगती हा सर्वच पक्षांचा प्रचाराचा मुद्दा आहे. विवेकी विचार करणारी निर्भय माणसे घडविल्याशिवाय प्रगती साधता येत नाही. अशी माणसे घडविणाऱ्या डॉक्टरांची हत्या हा प्रगतीच्या मार्गावर आघात आहे, असे कुणालाच वाटू नये, याचा खेद होतो.’ सत्ताधारी आणि विरोधक या दोहोंना हा विषय कसा गैरसोयीचा आहे, हे दाखवून देताना त्या म्हणाल्या, ‘सत्ताधाऱ्यांनी जादूटोणाविरोधी कायद्याचा मुद्दा मांडला, तर तो डॉक्टरांच्या हत्येनंतर विलंबाने केला, हे स्वीकारावे लागेल. शिवाय हल्लेखोरांचा तपास लावण्यात आलेले अपयशही स्वीकारावे लागेल. विरोधकांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून त्या-त्यावेळी टीका केली; परंतु आता तसे केल्यास कायद्याला विरोध का केला, याचा जाब विचारला जाईल. या कायद्याच्या कचाट्यात सर्वधर्मीय भोंदू सापडले असल्याने कायदा धर्मविरोधी असल्याचा प्रचार चुकीचा होता, हेही त्यांना मान्य करावे लागेल. म्हणून तेही गप्प आहेत. एकंदर सर्वांचीच अडचण आहे.’ डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘तपासाच्या बाबतीत झालेल्या हलगर्जीपणाबद्दल, स्थानिक पातळीवरही कोणत्याच पक्षाचे नेते आता बोलत नाहीत. राज्याला दिशादिग्दर्शन करणाऱ्या एका कार्यकर्त्याचा खून होतो, वषार्नंतरही मारेकरी सापडत नाहीत, हे सगळ्याच पक्षांनी नजरेआड केले आहे.राज्य आणि स्थानिक पातळीवरील नेते डॉक्टरांच्या हत्येचा विषय टाळत आहेत. प्लँचेट प्रकरणाच्या अहवालाचे पुढे काय झाले, असेही कोणी विचारत नाही. डॉक्टरांच्या नावाने पुरस्कार दिले की जबाबदारी संपते का? मारेकरी का सापडले नाहीत, हे कोण विचारणार?- डॉ. हमीद दाभोलकरफुले, आंबेडकर, शाहू, शिवाजी महाराज, प्रबोधनकार ठाकरे, सावरकर यांची नावे सर्वपक्षीय नेते घेत आहेत. राज्याच्या अस्मिता याच नावांभोवती फिरतात. तथापि, विवेकी विचार हे या सर्व महापुरुषांचे वैशिष्ट्य होते, हे सगळेच विसरले आहेत. - मुक्ता दाभोलकरसक्रिय राजकारणाचा सल्ला नाकारलासत्ताधारी आणि विरोधक यांपैकी कोणीही डॉ. दाभोलकरांची हत्या आणि जादूटोणाविरोधी कायद्याचा विषय चर्चेत आणणार नाहीत, याची खात्री असलेल्या हितचिंतकांनी प्रमुख नेत्यांविरोधात थेट निवडणूक लढविण्याचा सल्ला दाभोलकर कुटुंबीयांना दिला होता. जय-पराजय नव्हे, तर केवळ डॉक्टरांच्या हत्येच्या विषयावर चर्चा घडवून आणणे हाच उद्देश त्यामागे होता; तथापि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम हे निवडणुकीच्या पलीकडचे व्यापक राजकारणच असून, निवडणुकीच्या राजकारणात पडायचे नाही, असा निर्णय आपण घेतल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.