शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन नको, हक्काची घरे वाचवा

By admin | Updated: July 11, 2017 00:28 IST

रिंगरोड प्रकल्पामध्ये घरे जाणाऱ्या बाधितांनी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने मागील काही दिवसांपासून विविध प्रकारे आंदोलने सुरू केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करावेत : रिंगरोड प्रकल्पामध्ये घरे जाणाऱ्या बाधितांनी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने मागील काही दिवसांपासून विविध प्रकारे आंदोलने सुरू केली आहेत. त्याचाच भाग म्हणून नागरिकांनी आपली हक्काची घरे वाचविण्यासाठी रविवारी चिंचवडेनगर येथील दगडोबा चौकात मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सत्तारूढ पक्ष नेते एकनाथ पवार आंदोलकांशी बोलताना ‘रिंगरोड प्रकल्प रद्द नाही झाला तर ज्यांची घरे जातील त्यांचे आम्ही पुनर्वसन करू’, असे वक्तव्य केल्यामुळे आंदोलक गोंधळ घालत आक्रमक झाले. या वेळी परिस्थिती पाहता उपस्थित लोकप्रतिनिधींना तेथून काढता पाय घ्यावा लागला होता. घर बचाव संघर्ष समितीच्या पोस्टकार्ड पाठवा आंदोलनाला मार्गदर्शन करण्याकरिता प्रथमच सत्तारूढ पक्षनेते आणि आमदार उपस्थित राहिले याचा आम्हाला आनंद वाटला़ ते आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून यशस्वी मार्ग काढतील अशी आम्हाला अपेक्षा होती. परंतु भाजपाच्या नेत्यांनी नकारात्मक भूमिका दर्शविल्यामुळे आंदोलकांच्या भावनेचा उद्रेक झाला. मात्र सत्ताधाऱ्यांच्याच भूमिकेमुळे आज गोंधळ निर्माण झाला. उलट पवार यांनी आम्ही तुमच्या घराच्या विटेलाही धक्का लागू देणार नाही, अशी भूमिका घ्याला हवी होती. - विजय पाटील, समन्वयक घर बचाव संघर्ष समितीआमची घरे कोणत्याही परिस्थितीत तोडता कामा नये. नेत्यांनी आमच्या घरांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी. अगोदर रिंगरोडचे आरक्षण रद्द करा व आमची घरे वाचवा. आजच्या आंदोलनात पालिकेत सत्तेत असणाऱ्या सताधाऱ्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही बाधित नागरिक जाहीर निषेध करीत आहोत. - हंसराज चिघळीकर, रिंगरोड बाधित नागरिक, बिजलीनगरघर म्हणजे आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून आमच्या घरांवर कुऱ्हाड आणून विकास साधायचा असेल तर या विकासाला आमचा विरोध आहे. आमच्या घरांचा प्रश्न नेत्यांनी काढू नये. आम्हाला आहे त्या ठिकाणी आहे तसे राहू द्या. आम्हाला पुनर्वसन नको. आम्ही आमचे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करीत असताना आमच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.- रेखा भोळे, पदाधिकारी घर बचाव संघर्ष समितीलोकांनी विश्वासावर निवडून देऊन सत्ताबदल केला. हेच आज आमचा विश्वासघात करीत आहेत. त्यांचा आम्ही निषेध करीत आहोत. कोणत्याही परिस्थितीत आमची घरे वाचली पाहिजेत. आम्हाला पुनर्वसन नको. जोपर्यंत आम्हाला योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करणारच.- अमर मुलगे, बाधित नागरिक, बिजलीनगरसत्ताधाऱ्यांच्या आजच्या वाक्त्व्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आम्हाला त्यांची घरे नकोत़ आम्हाला आमची हक्काची घरे वाचली पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाने आमच्या घरावर असणारा प्राधिकरणाचा शिक्का काढून सातबाऱ्यावर आमची नोंद करावी. आमची घरे वाचली पाहिजेत व प्रस्तावित रिंगरोड रद्द झाला पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी विरोधक असताना अनधिकृत घरांबाबत दिलेला शब्द पाळावा. - धनाजी येळेकर, बाधित नागरिक, थेरगाव