शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास लेखनात केवळ उदो उदो नको; ‘चुका ’ ही मांडल्या जायला हव्यात : डॉ. गो.बं देगलुरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 23:00 IST

मूर्तिशास्त्र अभ्यासक आणि मंदिरस्थापत्य तज्ञ डॉ. गो.बं देगलूरकर यांना पुरातत्व क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबददल ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

- नम्रता फडणीस - * पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला.काय वाटतं?_- एवढा मोठा मानाचा पुरस्कार मिळाला, त्याबददल आनंद तर आहेच. विविध क्षेत्रातील इतक्या मोठ्या मंडळींना हा पुरस्कार दिला आहे त्यांच्या पंक्तीत मला बसायला मिळाले हे माझे भाग्यसमजतो. * पुण्याशी ॠणानुबंध कसे जुळले? - माझे मँट्रिकपर्यंतचे शिक्षण पंढरपूरमध्ये झाले.  घरातील वडिलधा-या व्यक्तींनी सांगितले की पंढरपूर सोडायचे ठरवले आहे तर पुण्याला जा. तिथे चांगले शिक्षण मिळते. पुण्याच्या स.प महाविद्यालयात प्रवेश घेतला. आम्ही सगळे भाऊ स.प.मध्येच शिकलो.  इतिहास विषय घेऊन पदवी संपादन केली. त्यानंतर हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठातून एम.ए पूर्ण केले. पुन्हा पी.एच.डी साठी डेक्कन कॉलेजमध्ये आलो. * पुण्यात पदवी आणि पी.एचडी चे शिक्षण पूर्ण झाले, मग प्रबंधाचा विषय मराठवाडा संस्कृतीचा इतिहास हा का निवडासा वाटला? -त्याचे कारण म्हणजे मी मूळचा मराठवाड्याचा उर्वरित महाराष्ट्राचा असा समज आहे की मराठवाडा हा मागासलेला आहे. मग मागासलेला असेल तर हा प्रारंभापासून आहे का? ते पुढे आणावे म्हणून हा विषय घेतला. गुरू म्हणाले, तुमच्या अभ्यासाने सिद्ध झाले की तो मागासलेला आहे तर तुम्ही ते लिहाल का? मी हो म्हटले आणि हा विषय निवडला. * मूर्तिशास्त्र हा विषय अभ्यासासाठी घेण्यामागे कोणता विचार होता? - पुरात्वाचेच मंदिर स्थापत्य, मूर्तीशास्त्र तसेच शिलालेख आणि नाणकशास्त्र हे भाग आहेत. भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण हे मंदिरे आणि मूर्ती आहेत. मूर्ती कशाकरिता निर्माण झाल्या? मूर्तिपूजा ही ग्रीस, इटली मध्ये अस्तिवात होती. त्यांच्या संस्कृतीचे संदर्भ बदलत गेले आणि मूर्तिपूजा मागे पडली. भारतात मूर्तिपूजा जा आजही होते, त्याला इतके महत्व का आहे? हे जाणून घ्यावेसे वाटले. एखाद्या समाजाला गुणांची गरज असते तेव्हा त्या गुणांचे समूर्तकरण करणे म्हणजे मूतीर्पूजा असते. समाज प्रबोधन आणि समाजाचे अभिसरण यासाठी मूर्तिपूजा आवश्यक असते. * मूतीर्पूजेबददल समाजात जी मिथ्थ्यक आहेत, जी धारणा आहे, त्याबददल काय वाटते? अमुक एका मंदिरात महिलांना प्रवेश निषिद्ध आहे, असे म्हटले जाते? त्यामागची नक्की सत्यता काय आहे?- मूर्तीबद्दल समाजात खूप मोठे गैरसमज आहेत. ३३ कोटी देव असे म्हटले जाते तेव्हा ते ३३ प्रकारचे देव आहेत. नृत्य गणपतीची मूर्ती बसवली की तो नाचवतो म्हणतात मग ती बसवली तर? तो बसवतो का? असे विचारले तर उत्तर कोणाकडेच नसते. देव भक्तांचं भल करणारा असेल तर तो वाईट करेल का? शास्त्राच्या दृष्टीने या समजाला कोणताही आधार नाही. समाजात ज्या गोष्टी दृढ होतात त्या अपसमजामुळे झालेल्या असतात.  स्वार्थ लोपता हे त्यामागचे कारण आहे. प्राचीन काळात कुठलीच अशी बंधनं नव्हती. ॠग्वेदात विद्वान स्त्रिया पाहातो त्या पुरूष विद्वानांशी वाद घालून जिंकू शकतात मग त्यांनाच प्रवेश नाकारणे हे हास्यास्पद वाटते. * काळानुरूप इतिहासाचे संदर्भ बदलत जातात, त्यामुळे इतिहासाचे पुर्नलेखन होणे आवश्यक आहे का? सध्याची स्थिती काय आहे?- आतापर्यंत जो इतिहास लिहिला तो परक्यांनी लिहिला. ज्या लोकांना राज्य करायचे आहे ते इतिहासांच्या साधनाद्वारे त्यांना अनुकूल होईल अशी घडण ते इतिहासाला देत असतात. आपण इतिहास केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवतो, त्यामुळे इतर प्रांतापर्यंत आपल्या लोकांचे काम पोहोचत नाही. तिचं साधन असतात केवळ दृष्टीकोन बदलला पाहिजे. भारतीयांच्या दृष्टीकोनातून इतिहास लिहिला गेला पाहिजे.* इतिहासकार त्यांच्या सोयीने इतिहास लिहितात अशी एक टिका केली जाते? त्याबददल काय वाटते?- एखाद्याने इतिहास त्रोटक साधन किंवा दृष्टीकोनातून लिहिला आहे असे जर  कुणाला वाटले तर अन्य साधनांद्वारे तो पूर्ण करता आला पाहिजे. इतिहास लिहिणा-याचा दृष्टीकोन हा तसा म्हटल तर  पक्षपाती असतो. मात्र, देशाला उपयुक्त ठरेल असा सर्वमान्य इतिहास लिहिला गेला पाहिजे. आपल्या काही चुका झाल्या असतील तर त्याही लिहायला हव्यात. इतिहास हा पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारा असतो. चुकीच्या गोष्टीही समोर आल्या पाहिजेत. * प्राचीन संस्कृतीमधील अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अद्यापही समोर आलेल्या नाहीत? - महाराष्ट्राचा इतिहास ताम्रपाषाण, पुराश्म आणि नवाश्मयुगापर्यंत पोहोचला आहे. अजूनकाही ठिकाणी उत्खनन झाली तर महाराष्ट्राची संस्कृती किती समृद्ध होती हे समोर येईल. राज्यात कितीतरी मंदिरे आहेत त्यांचा अभ्यास व्हायला पाहिजे. मला  टागोर नँशनल फेलोशीप मिळाली आहे त्यासाठी हिस्ट्रोरिकल रिलिजिअस कल्टवाईज स्टडी महाराष्ट्र बेस्ड आॅन अनकॉमन युनिक इमेजेस हा विषय अभ्यासासाठी निवडला आहे. प्राचीन काळातील देवळांचा अभ्यास देखील झालेला नाही. तो व्हायला हवा. त्यातून ज्या उणिवा राहिल्या आहेत त्या दूर होतील. ------------------------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेhistoryइतिहास