शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

मुलामुलीत भेदभाव नको !

By admin | Updated: August 26, 2016 06:54 IST

वडिलांकडून देखभालीचा खर्च मागण्याकरिता केस करण्यापूर्वी भराव्या लागणाऱ्या कोर्ट फीमधून गुरुवारी उच्च न्यायालयाने सवलत दिली

मुंबई : मुलींप्रमाणे आईवर अवलंबून असलेल्या अल्पवयीन मुलालाही वडिलांकडून देखभालीचा खर्च मागण्याकरिता केस करण्यापूर्वी भराव्या लागणाऱ्या कोर्ट फीमधून गुरुवारी उच्च न्यायालयाने सवलत दिली. त्यामुळे आता यापुढे अल्पवयीन मुलांना कुटुंब न्यायालयात देखभालीचा खर्च मागण्यापूर्वी कोर्ट फी भरण्याची आवश्यकता भासणार नाही.कौटुंबिक वाद, घरगुती हिंसाचार किंवा घटस्फोटासाठी महिलेने अर्ज केला असल्यास त्या महिलेला व वडिलांकडून देखभालीचा खर्च मागणाऱ्या मुलीला कोर्ट फी भरण्यामधून राज्य सरकारने १९९४च्या अधिसूचनेद्वारे वगळले आहे. मात्र यामध्ये आईवर अवलंबून असलेल्या अल्पवयीन मुलाला ग्राह्य धरण्यात आलेले नव्हते. त्यामुळे कुटुंब न्यायालय अशा केसेस दाखल करणाऱ्या महिलांकडून किंवा मुलींकडून कोर्ट फी आकारत नाही. परंतु, आईवर अवलंबून असलेल्या अल्पवयीन मुलाने वडिलांकडून देखभालीचा खर्च मागण्याकरिता अर्ज केल्यास त्याला कोर्ट फी भरणे बंधनकारक केले आहे. याविरुद्ध मजलिस मंच या संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मुलींप्रमाणेच अल्पवयीन मुलांनाही कोर्ट फी न भरण्याची सवलत द्यावी, अशी मागणी मजलिस मंचने केली आहे.त्यावर कुटुंब न्यायालयाच्या निबंधकांनी न्यायालय राज्य सरकारच्या १९९४च्या अधिसूचनेचे योग्य प्रकारे पालन करत आहे, असे न्यायालयाला सांगितले. ‘१९९४च्या अधिसूचनेत केवळ महिलांना व मुलींना कोर्ट फीमधून सवलत देण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे कुटुंब न्यायालय महिलांकडून व मुलींकडून कोणत्याही प्रकारची कोर्ट फी आकारत नाही. परंतु, या अधिसूचनेत आईवर अवलंबून असलेल्या अल्पवयीन मुलांना कोर्ट फीमधून वगळण्याचा उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे कुटुंब न्यायालय वडिलांकडून देखभालीचा खर्च मागण्याचा अर्ज करणाऱ्या अल्पवयीन मुलांकडून कोर्ट फी आकारते,’ असा युक्तिवाद कुटुंब न्यायालयातर्फे अ‍ॅड. नेहा भिडे यांनी केला. (प्रतिनिधी) >मुलालाही वगळाअल्पवयीन मुलगा त्याच्या आईद्वारेच न्यायालयात अर्ज करतो. मुळातच त्याची आई देखभालीचा खर्च मागण्यासाठी न्यायालयात आलेली असते. त्यामुळे आईवरच अवलंबून असलेल्या अल्पवयीन मुलाकडून कोर्ट फी कशी आकारली जाऊ शकते? असे म्हणत उच्च न्यायालयाने मुलीप्रमाणे अल्पवयीन मुलालाही कोर्ट फीमधून वगळा, असा आदेश दिला.