शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

विभागनिहाय एटीएस पथक

By admin | Updated: December 17, 2014 23:47 IST

कल्याणमधील चार युवकांनी दहशतवादी संघटनेत सहभागी होऊन इराकमध्ये सक्रिय झाल्याचा मुद्दा शिवसेनेच्या नीलम गो-हे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला

कल्याणमधील चार युवकांनी दहशतवादी संघटनेत सहभागी होऊन इराकमध्ये सक्रिय झाल्याचा मुद्दा शिवसेनेच्या नीलम गो-हे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. ही बाब चिंतेची असून राज्यातील एटीएस काय करीत आहे, असा सवाल त्यांनी केला. अशा प्रकारच्या घटनांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी तसेच त्यावर लक्ष ठेवण्यासाठी विभागनिहाय एटीएस पथक हवे, अशी सूचना शिवसेनेचे अनिल परब यांनी केली. त्यावर निवेदन करताना रणजित पाटील यांनी याबाबत सरकार विचार करीत असल्याचे सांगितले. नागरिकांना तक्रार करणे सुलभ व्हावे यासाठी एक हेल्पलाईन सुरू करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.कल्याण येथील प्रकरणाचा तपास एनआयए करीत आहे. राज्याचे एटीएस पथक त्यांना मदत करीत आहे. समाजातील वाईट प्रवृत्तीवर एटीएसचे लक्ष आहे. त्यांचे संशयास्पद अड्डे आढळल्यास ते उद््ध्वस्त करू, असे रणजित पाटील म्हणाले. प्रधान समितीच्या अहवालातील शिफारशींवरील अंमलबजावणीची माहिती पटलावर ठेवण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. भाई गिरकर, शोभा फडणवीस जोगेंद्र कवाडे, ख्वाजा बेग यांनीही चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)