शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सभेत फोडली अंडी !

By admin | Updated: December 20, 2014 00:46 IST

कुक्कुटपालन योजनेसाठी अतिरिक्त निधीच्या मुद्दय़ावर विरोधक आक्रमक.

अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत अंडी उबवणी यंत्र आणि कुक्कुटपालन योजना राबविण्याकरिता अतिरिक्त निधीची तरतूद करण्याच्या विषयावर शुक्रवारी बोलविण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत अतिरिक्त निधीची तरतूद करण्याच्या मुद्दय़ावर आक्रमक पवित्रा घेतला. त्यावरून सभेत झालेल्या प्रचंड गोंधळात संतप्त झालेल्या काही महिला सदस्यांनी सभेत चक्क अंडी फोडली.जिल्हा परिषद सेस फंडातून समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर अंडी उबवणी यंत्र संच पुरविणे आणि कुक्कुटपालन योजना राबविण्याकरिता अतिरिक्त निधीची तरतूद करण्याच्या विषयावर शुक्रवारी जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलविण्यात आली होती. या योजनेसाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठवलेले पत्र वाचून दाखविण्याची मागणी विरोधी पक्षनेता रमण जैन, सदस्य ज्योत्स्ना चोरे यांच्यासह विरोधी गटाच्या सदस्यांनी सभेच्या प्रारंभी केली. नितीन देशमुख, चंद्रशेखर पांडे व इतर सदस्यांनीही या विषयावर आक्षेप घेत चर्चा करण्याची मागणी केली. या मुद्दय़ावर चर्चा खूप झाली, आता मतदान घ्या, अशी मागणी सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी केली. दुसरीकडे या मुद्दय़ावर चर्चा करण्याची मागणी विरोधी गटाच्या सदस्यांनी लावून धरली. त्यामुळे या मुद्दय़ावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बराच काळ गोंधळ झाला. या गोंधळाच्या वातावरणात आक्रमक पवित्रा घेतलेल्या ज्योत्स्ना चोरे व काही महिला सदस्यांनी सभागृहात अध्यक्ष, पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या दिशेने भिरकावत, सभेत चक्क भिंतीवर अंडी फोंडली.