शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

दोषींनी मागितली शिक्षेत सवलत

By admin | Updated: July 30, 2016 03:29 IST

औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी दोषी असलेल्या १२ आरोपींनी आपले कृत्य जन्मठेपेच्या शिक्षेएवढे भयानक नसून आपण केवळ शस्त्रसाठा आणि आरडीएक्सची वाहतूक करण्याचे काम पार पाडले

मुंबई : औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी दोषी असलेल्या १२ आरोपींनी आपले कृत्य जन्मठेपेच्या शिक्षेएवढे भयानक नसून आपण केवळ शस्त्रसाठा आणि आरडीएक्सची वाहतूक करण्याचे काम पार पाडले आहे. त्यामुळे कटाच्या सूत्रधाराप्रमाणे आपल्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येऊ नये. कमीतकमी शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती दोषींतर्फे त्यांच्या वकिलांनी विशेष ‘मकोका’ न्यायालयाला केली. मात्र सरकारी वकिलांनी या दोषींना कोणती शिक्षा ठोठावण्यात यावी, यावर युक्तिवाद करण्यासाठी एक दिवसाची मुदत मागितली. विशेष न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत शनिवारी सरकारी वकिलांना शिक्षेबाबत युक्तिवाद करण्याचे निर्देश दिले.या प्रकरणातील १२ दोषींच्या वकिलांनी शिक्षेबाबत युक्तिवाद पूर्ण केला. सरकारी वकील वैभव बगाडे यांनी दोषींच्या शिक्षेबाबत युक्तिवाद करण्यास एका दिवसाची मुदत मागितली. विशेष ‘मकोका’ न्यायालयाचे न्या. श्रीकांत अणेकर यांनी त्यांची विनंती मान्य करत शनिवारी यावर सरकारी वकिलांना युक्तिवाद करण्याचे निर्देश दिले.दोषींतर्फे अ‍ॅड. युग चौधरी यांनी युक्तिवाद केला. ‘राजकीय नेत्यांची हत्या करण्याचा जरी दोषींचा कट असला तरी त्यांनी पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार केला नाही. केलेल्या कृत्याचा त्यांना पश्चात्ताप झाला आहे. त्यामुळे त्यांना १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात यावी,’ असा युक्तिवाद त्यांनी केला. (प्रतिनिधी)कमी शिक्षेची मागणी- अ‍ॅड. चौधरी यांनी १९९३च्या बॉम्बस्फोटाचे उदाहरण दिले. १९९३च्या बॉम्बस्फोटातील दोषींना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेत कपात करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या खटल्यातील दोषींनी कट रचलेला नाही. त्यामुळे त्यांना मुख्य सूत्रधाराप्रमाणे किंवा कट रचणाऱ्यांप्रमाणे शिक्षा देऊ नये, असा युक्तिवाद बचावपक्षाच्या वकिलांनी केला.