शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम; महाडीबीटी योजनेंतर्गत अनुदान जमा करण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 05:36 IST

राज्यातील विविध जिल्ह्यांत लाभार्थी शेतकऱ्यांना ‘महाडीबीटी’ योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत यावर्षी महाडीबीटी योजना राबविण्यात येत आहे.

संतोष येलकरलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कृषी विभागामार्फत यावर्षी प्रथमच राबवण्यात येत असलेल्या महाडीबीटी योजनेंतर्गत राज्यातील २ लाख २ हजार २३६ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा करण्याची प्रक्रिया मार्च महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. 

त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांत लाभार्थी शेतकऱ्यांना ‘महाडीबीटी’ योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत यावर्षी महाडीबीटी योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत ट्रॅक्टर व इतर कृषी अवजारे आणि ठिबक, तुषार संच व इतर सिंचन सुविधांच्या अनुदानासाठी राज्यातील शेतकऱ्यांकडून ‘महाडीबीटी’ पोर्टलव्दारे अर्ज करण्यात आले  होते. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी राज्यातील  २ लाख २ हजार २३६ लाभार्थी शेतकऱ्यांची लाॅटरी पध्दतीने  गत फेब्रुवारीमध्ये निवड करण्यात आली. त्यामध्ये ट्रॅक्टर व इतर कृषी अवजारे अनुदानासाठी २९ हजार ३९ आणि ठिबक, तुषार व इतर सिंचन सुविधा साहित्याच्या अनुदानासाठी १ लाख ७३ हजार १९७ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रियाnमहाडीबीटी योजनेत निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांची पूर्वसंमती घेतल्यानंतर योजनेंतर्गत मंजूर साहित्याची खरेदी करणे आवश्यक आहे.nखरेदी केलेल्या साहित्याचे देयक ऑनलाइन सादर केल्यानंतर कृषी विभागामार्फत तपासणी केली जाते व त्यानंतर महाडीबीटी पोर्टलव्दारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते. 

महाडीबीटी योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, अनुदानाची रक्कम खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत आहे.- शंकर तोटावार, कृषी सहसंचालक, अमरावती 

टॅग्स :Farmerशेतकरी