शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 14:40 IST

शरद पवार यांनी पोलिसांच्या गाडीतून रसद पुरवली जात असल्याचा आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दुसरीकडे, निवडणुकीसाठी राज्यात पैशांचा महापूर आल्याचं निवडणूक आयोगाने केलेल्या कारवायांमधून समोर आलं आहे. १५ ऑक्टोबर रोजी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर प्रशासनाने कठोरपणे नाकाबंदी, तपासणी करून बेकायदेशीर पैशांच्या व्यवहारांवर कारवाई करणे सुरू केले. या कारवाईत शेकडो कोटी रुपये सापडले आहेत. यावरुनच आता राष्ट्रावादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. पोलिस गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे.

निवडणुकीची आचारसंहिता लागताच राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे राज्यातील विविध भागांमध्ये तपासणी सुरु करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रक्कम देखील सापडली आहे. त्यावरुन आता शरद पवार यांनी भाष्य केलं. बारामती येथे दीपावली पाडव्यानिमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी गौप्यस्फोट केला. पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पोहोचवली जाते.पण अधिकाऱ्यांचे भवितव्य संकटात जावू नये म्हणून मी अधिक बोलत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं. शरद पवारांनी केलेल्या दाव्यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. "मला लोक असं सांगतात की त्यांच्या काळात असं चालायचं. आता त्यांना तो भास होत असेल. आमच्या काळात तरी असं काही होत नाही," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले शरद पवार?

"या सरकारचं वैशिष्ट्य आहे की, विमानाने एबी फॅार्म पाठवले. पोलीस दलाच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात आहे. ⁠हे मी जाहीरपणे सांगणार होतो. मात्र, माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करु नये अशी गळ घातली आहे. पण ऐकायला मिळतंय की पोलीस दलाची वाहनं आहेत त्यातून उमेदवारांना रसद पोहोचवली जात आहे. माझ्या हातात ऑथेटिंक माहिती असती तर मी वाटेल ते केलं असतं. पण माहितीशिवाय भाष्य करणं हा माझा स्वभाव नाही," असं शरद पवार यांनी म्हटलं.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस