शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाटोळे यांचे केईएममध्ये देहदान

By admin | Updated: May 13, 2015 01:45 IST

आई रिटायर होतेय, जाऊबाई जोरात, श्यामची मम्मी, झोपा आता गुपचूप यांसारखी गाजलेली नाटके आपल्या लेखणीतून उतरवणारे ज्येष्ठ नाटककार व लेखक अशोक पाटोळे

मुंबई : आई रिटायर होतेय, जाऊबाई जोरात, श्यामची मम्मी, झोपा आता गुपचूप यांसारखी गाजलेली नाटके आपल्या लेखणीतून उतरवणारे ज्येष्ठ नाटककार व लेखक अशोक पाटोळे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. मंगळवारी पहाटे जसलोक रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूपूर्वी त्यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांचे पार्थिव केईएम रुग्णालयाकडे सोपविण्यात आले. १९७१मध्ये त्यांनी ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ ही एकांकिका लिहिली आणि तिथून त्यांच्या नाट्यप्रवासाला प्रारंभ झाला. त्यानंतर मराठी रंगभूमीवर त्यांनी एकाहून एक सरस अशी नाटके दिली. यात मी माझ्या मुलांचा, श्यामची मम्मी, जाऊबाई जोरात, झोपा आता गुपचूप, प्रा. वाल्मीकी रामायण, देखणी बायको दुसऱ्याची, हीच तर प्रेमाची गंमत आहे, एक चावट संध्याकाळ आणि अलीकडेच आलेले आई तुला मी कुठे ठेवू? अशा नाटकांचा समावेश आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ हा त्यांचा विनोदी कथासंग्रह गाजला. तसेच ‘पाटोळ्याच्या पाटोळ्या’ हा काव्यसंग्रहही त्यांच्या नावावर आहे. ‘एक जन्म पुरला नाही’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशन मार्गावर होते. काही दिवसांतच या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार होते. हसरते, अधांतर अशा दूरचित्रवाणी मालिकांचे लेखनही त्यांनी केले होते.