शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

‘औद्योगिक’ गुंतवणुकीत घट, घोषणा ११ लाख कोटींची, गुंतवणूक एक लाख ९० हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:24 IST

राज्यात ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचे चित्र निर्माण केले गेले असले तरी प्रत्यक्षात या क्षेत्रातील गुंतवणुकीत बरीच घट झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

- राजेश निस्ताने

यवतमाळ : राज्यात ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचे चित्र निर्माण केले गेले असले तरी प्रत्यक्षात या क्षेत्रातील गुंतवणुकीत बरीच घट झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.
राज्यात ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात सुमारे ११ लाख ३७ हजार ७८३ कोटींची गुंतवणूक होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. मात्र आतापर्यंत ही गुंतवणूक अवघ्या दोन लाख ६९ हजार ८१० कोटींवर पोहोचली आहे. भाजपा सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्योगांच्या संख्येत सुमारे साडेपाचशेने घट झाली आहे. गुंतवणुकीचे प्रमाण साडेसात टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांवर आले आहे.
‘मेक इन इंडिया’ सप्ताहादरम्यान उद्योग खात्याशी संबंधित एकूण दोन हजार ८५० सामंजस्य करार झाले. त्यातून चार लाख १३ हजार कोटींची गुंतवणूक सरकारला अपेक्षित होती. परंतु सामंजस्य करारापैकी आतापर्यंत दोन हजार ४५६ करारांचीच प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली असून त्याद्वारे एक लाख ९० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. नोटाबंदी, जीएसटीनंतर ही गुंतवणूक घटल्याचे मानले जाते.

उद्योगांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना
नवनवीन उद्योग यावेत, त्यातून गुंतवणूक वाढावी यासाठी विविध योजना राबवून उद्योगांना आकर्षित केले जात आहे. उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व फॅब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती विशेष प्रोत्साहन योजना व महिला उद्योजकांसाठी धोरणे जाहीर केली आहेत. त्या माध्यमातून उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे. विविध सुधारणा, एक खिडकी प्रणालीद्वारे उद्योगांना ‘ईझ आॅफ डुर्इंग बिझनेस’ उपक्रमात समाविष्ट केले जात आहे. मात्र त्यानंतरही नव्या उद्योगांची उभारणी व गुंतवणुकीला अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र