शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

डेक्कन क्वीनला मिळाली नवी ‘डायनिंग कार’

By admin | Updated: May 30, 2015 09:07 IST

दुरुस्तीच्या नावाखाली मागील सात महिन्यांपूर्वी डेक्कन क्वीनपासून वेगळी करण्यात आलेली डायनिंग कार पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

पुणे : दुरुस्तीच्या नावाखाली मागील सात महिन्यांपूर्वी डेक्कन क्वीनपासून वेगळी करण्यात आलेली डायनिंग कार पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. डेक्कन क्वीनच्या वर्धापन दिनी येत्या सोमवारी ही कार पुन्हा जोडली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने एक प्रकारे प्रवाशांना आपल्या ‘क्वीन’च्या वर्धापन दिनाची भेट दिली आहे.भारतीय रेल्वेच्या शिरपेचातील तुरा असलेल्या आणि प्रवाशांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलेली डेक्कन क्वीन ही रेल्वेगाडी सध्या डायनिंग कारविना धावत आहे. मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात दुरुस्तीच्या नावाखाली ही कार डेक्कन क्वीनपासून वेगळी करण्यात आली होती. त्यानंतर ही डायनिंग कार भंगारात काढण्यात येणार असल्याचा निर्णयही मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केला. त्यावर रेल्वे प्रवासी संघटना तसेच प्रवाशांनी त्याला मोठा विरोध केला. मात्र, प्रवाशांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने ही कार पुन्हा नव्या स्वरूपात डेक्कन क्वीनला जोडणार असल्याचे स्पष्ट केले. काही दिवसांपासून या कारमध्ये काही बदल करण्याचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाले असून, येत्या सोमवारी ही कार डेक्कन क्वीनला जोडली जाणार आहे. सोमवारी डेक्कन क्वीनचा ८६ वा वर्धापन दिन आहे. त्या दिवशी प्रवाशांना ही भेट दिली जाणार आहे.डायनिंग कारसाठी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी पाठपुरावा केला होता. त्या म्हणाल्या, ‘‘डेक्कन क्वीनला ऐतिहासिक महत्त्व आहे. दि. १ जून १९३० पासून या गाडीला डायनिंग कार ही सुविधा देण्यात आली होती. अनेक प्रवासी प्रवासादरम्यान या कारमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचा आस्वाद घेत होते. मात्र, प्रशासनाने ही कार काढण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली होती. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने डायनिंग कार पुन्हा जोडण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांसाठी ही आनंददायी बाब आहे.