शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जापोटी मुलगा तारण

By admin | Updated: December 26, 2014 00:56 IST

उधार घेतलेल्या १० हजार रुपयांच्या रकमेची परतफेड करण्यासाठी मेळघाटातील एका आदिवासी पित्याने आपला १४ वर्षांचा मुलगाच यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात मेंढपाळाकडे तारण ठेवल्याचा

मेळघाटातील आदिवासी पित्याची अगतिकता : पोलिसांनीच सुखरूप घरी पोहोचविलेकिशोर वंजारी - नेर (यवतमाळ) उधार घेतलेल्या १० हजार रुपयांच्या रकमेची परतफेड करण्यासाठी मेळघाटातील एका आदिवासी पित्याने आपला १४ वर्षांचा मुलगाच यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात मेंढपाळाकडे तारण ठेवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण नेर पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांनी या बालकाला त्याच्या गावी सुखरुप पोहोचवून त्याची सुटका केली. महादेव संजू ऊर्फ दातू कासदेकर (१४) रा. डाबका ता. धारणी जि. अमरावती असे या आदिवासी मुलाचे नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्याच्या पिंपळगाव (डुब्बा) या गावात सीताराम कोडापे हा मेंढपाळ राहतो. तो तीन महिन्यांपूर्वी डाबका गावात आपल्या जावयाकडे गेला होता. तेथे त्याची भेट महादेवच्या वडील संजू कासदेकर याच्याशी झाली. कासदेकर याने आपली आर्थिक परिस्थिती कथन करून मेंढपाळाकडे १० हजार रुपयांच्या रकमेची मागणी केली. या रकमेची परतफेड करण्यासाठी आपल्या १४ वर्षीय महादेव या मुलाला मेंढपाळाकडे कामासाठी पाठविण्याची तयारी दर्शविली. हा व्यवहार मान्य झाल्याने मेंढपाळाने १० हजार रुपये महादेवच्या पित्याला उधार म्हणून दिले. त्याचवेळी महादेवला कामासाठी तो पिंपळगाव (डुब्बा) येथे सोबत घेऊन आला.गेल्या तीन महिन्यांपासून महादेव मेंढपाळाकडे मेंढ्या चारण्याचे काम करीत होता. त्यापोटी त्याला अडीच हजार रुपये दरमहा मजुरी ठरली होती. महादेवच्या पित्याकडून काही तक्रार आल्यास सदर मेंढपाळाविरुद्ध कारवाई करता येईल, अशी प्रतिक्रिया या घटनेवर नेरचे ठाणेदार गणेश भावसार यांनी ‘लोकमत’कडे नोंदविली. उपरोक्त घटनेवरून आदिवासीबहुल मेळघाटातील शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक परिस्थिती आणि त्यातून निर्माण होणारी हतबलता उघड झाली आहे. संजू कासदेकर याला दोन पत्नी, चार मुले व दोन मुली आहेत.मुलाला आणायला तिकिटासाठीही नव्हते पैसे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी महादेवला धनज येथील पोलीस पाटलाकडे आणले. त्यांनी त्याला नेर पोलीस ठाण्यात हजर केले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता या घटनेवर महादेवच्या कथनातून शिक्कामोर्तब झाले. नेर पोलिसांनी महादेवला घेऊन जावे म्हणून त्याच्या वडिलाकडे संदेश पाठविला. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे तिकिटासाठीही पैसे नसल्याने ते येऊ शकले नाहीत. अखेर नेर पोलिसांनीच २३ डिसेंबर रोजी महादेवला डाबका येथे सुखरुप पोहोचविले.