पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

By Admin | Updated: December 30, 2014 00:25 IST2014-12-30T00:25:48+5:302014-12-30T00:25:48+5:30

दीड महिन्याच्या ‘संघर्ष’ची जीवनयात्रा संपली, बुलडाणा जिल्ह्यातील घुटी येथील घटना.

The death of a turtled-dog dog | पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा): कडाक्याच्या थंडीत कोवळय़ा उन्हाची ऊब मिळावी, यासाठी अंगणातील खाटेवर टाकलेल्या एक दीड महिन्याच्या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन ठार केल्याची घटना सोमवारी सकाळी मेहकर तालुक्यातील घुटी येथे घडली. मेहकर तालुक्यातील घुटी येथील सरदार कुटुंबातील लहानग्या प्रणव उर्फ संघर्षला त्याची आई सौ. सीमाने घराच्या अंगणात टाकलेल्या खाटेवर ठेवले होते. कडाक्याच्या थंडीत बाळाला कोवळ्या उन्हाची उब मिळेल या विचाराने त्याच्या आईने प्रणवला खाटेवर टाकले आणि बाळ खेळत असल्याचे पाहून स्वत: कामात लागून गेली. बाळाचे वडील दिलीप सरदार हे कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने चिमुकल्यावर हल्ला केला. त्याचा टाहो ऐकून आई घरातून धावत आली; परंतु पिसाळलेल्या कुत्र्याने प्रणवचे डोके तोंडात पकडून पळ काढला. हा प्रकार पाहून हादरलेल्या मातेने मदतीसाठी टाहो फोडला. तिचा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी पिसाळलेल्या कुत्र्यापासून चिमुकल्याची सुटका केली. बाळाचे वडिल दिलीप सरदार यांनी त्याला तात्काळ मेहकर येथील एक खासगी रुग्णालयात धाव घेतली; परंतु तोपर्यंत उशिर झाला होता.

Web Title: The death of a turtled-dog dog