पाचोड (जि.औरंगाबाद) : पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील ५५ वर्षीय शेतक-याचा सोमवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. राजेंद्र मुरलीधर वाकडे असे या मृत शेतकºयाचे नाव आहे. जिल्ह्यात हा उष्माघाताचा पहिलाच बळी आहे.भर उन्हात ते शेतात काम करीत असताना अचानक चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांचे भाऊ रमेश वाकडे यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी विहामांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंके यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी पैठण येथील खाजगी रुग्णालयात हलविले. तेथेही डॉक्टरांनी उपचार करून त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. रात्री उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. घाटी पोलीस चौकीतून पाचोड पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पाचोडचे सपोनि. महेश आंधळे व पोलीस उपनिरीक्षक प्रदीप एकसिंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली.
उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:40 IST
पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील ५५ वर्षीय शेतक-याचा सोमवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. राजेंद्र मुरलीधर वाकडे असे या मृत शेतकºयाचे नाव आहे. जिल्ह्यात हा उष्माघाताचा पहिलाच बळी आहे.
उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}