शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

डीबी, मातोश्रीच्या फायली कोणाकडे?

By admin | Updated: December 3, 2014 03:57 IST

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेवटच्या दोन महिन्यांत नगरविकास, गृहनिर्माण विभागाच्या फायलींवर निर्णय घेतले.

अतुल कुलकर्णी, मुंबईमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेवटच्या दोन महिन्यांत नगरविकास, गृहनिर्माण विभागाच्या फायलींवर निर्णय घेतले. त्या निर्णयाच्या फायली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे मागवून घेतल्या; मात्र त्यात डी. बी. रिअ‍ॅलिटी, मातोश्री अशा वादग्रस्त ठरलेल्या काही महत्त्वाच्या बिल्डरांच्या फायली आल्याच नाहीत, असे समजते.३३/७ या योजनेत सेस मालमत्तांचा पुनर्विकास करताना बिल्डरांना २.५ च्या ऐवजी ३ एफएसआय २०११ पासून दिला जातो. ज्या योजना २०११ पूर्वी पूर्ण झाल्या नाहीत, त्या पूर्ण करण्यासाठी देखील तीन एफएसआय दिला जातो. त्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. हे काम नगरविकास व गृहनिर्माण विभागाचे मंत्री व मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होते. भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, सरकारकडे अशी जवळपास ४० ते ४५ प्रकरणे पडून होती. त्यातली सात ते आठ प्रकरणे चव्हाण यांनी मंजूर केली होती; ज्यात डी. बी. रिअ‍ॅलिटी, मातोश्रीसह अनेकांच्या फायली होत्या. नगरविकास विभागाच्या फायलींची संख्या तुलनेने जास्त होती. या विभागाच्या सचिवांनी सगळ्याच फायली मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दिल्या. पाठवताना वादग्रस्त आणि वाद नसलेल्या देखील फायली पाठवल्या गेल्या. त्यावर निर्णय घेण्यास विलंब झाल्यास मुख्यमंत्री जबाबदार ठरतील आणि जुने निर्णय कायम ठेवले तरीही होणाऱ्या टीकेचे तेच धनी राहतील. सचिव मात्र या सगळ्यात नामानिराळे होतील, असा नगरविकास विभागाचा डाव असल्याचा आक्षेपही त्या नेत्याने घेतला. गृहनिर्माण विभागाने याच्या नेमके उलट केले. तो नेता म्हणाला, की गृहनिर्माण विभागाने ठरावीक लोकांच्याच फायली मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्या. ज्यांनी नियमांचे मोठे उल्लंघन केले, ज्यांच्यावर अनेक आक्षेप आहेत, अशा फायली मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्याच नाहीत. भाजपा नेत्याने घेतलेल्या या आक्षेपामुळे त्या फायली नेमक्या गेल्या कुठे आहेत, याचा शोध आता मुख्यमंत्री कार्यालय घेत असल्याचे वृत्त आहे.> म्हाडाला पुनर्विकासाची घरे बांधून देण्याची परवानगी मागणाऱ्या काही फायली होत्या. याआधी देखील काही बिल्डरांनी परवानग्या घेऊनही प्रत्यक्षात घरे बांधण्यात टाळाटाळ केल्याचे आक्षेपही या बिल्डरांवर होते. या फायलींवर फडणवीस सरकार कोणता निर्णय घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.