शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

VIDEO: तुमच्यात हिंमत असेल तर सरकार पाडाच; शिवसेनेच्या मंत्र्यांचं भाजपाला थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 8:02 PM

कोरोना संकटातही राजकारण सुचतंय; शिवसेना मंत्र्यांची जोरदार टीका

जळगाव: राज्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या आणि सर्वपक्षीय नेत्यांकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यपालांच्या भेटीगाठी यावरून वातावरण तापलं आहे. भाजपा राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन आजच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला. आता शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपाला थेट आव्हान दिलं आहे.राज्य सरकार पडणार असल्याच्या वावड्या काल-परवापासून उठवल्या जात आहेत. एकीकडे कोरोनासारखं संकट असताना दुसरीकडे अशा चर्चा केल्या जात आहेत. अशा प्रकारच्या वावड्या म्हणजे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कोरोना संकटाच्या काळात एकाग्रतेनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विचलित करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला. कोरोनाचं संकट संपल्यानंतर मैदानात येऊया. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर सरकार पाडाच, असं थेट आव्हान पाटील यांनी विरोधकांना दिलं. भाजपानं सरकार पाडून दाखवावं. पण त्याआधी सरकार कोरोना संकटात हरतऱ्हेचे प्रयत्न करत असताना स्वत: किती पुढाकार घेतला, त्याचा विचार विरोधकांनी करावा, असं पाटील म्हणाले. विरोधकांकडून कोरोनाच्या काळातही राजकारण सुरू आहे. मध्य प्रदेशची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा दावा त्यांनी केला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाला जनतेनं स्वीकारलं आहे. जनतेच्या मनात उद्धव ठाकरेंनी, अजित पवारांनी स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे विरोधकांकडून काही  केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकारला सल्ले देणाऱ्या फडणवीसांनी तेच सल्ले गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना द्यावेत. फडणवीस यांना अधिकाऱ्यांचा लवाजमा मागे पुढे घेऊन फिरण्याची सवय लागली होती. ती सवय सुटल्यानं आता त्यांना करमत नाही. पाण्याविना मासा तडफडतो, तशी फडणवीस यांची सत्तेशिवाय तडफड सुरू आहे. हे सगळं राज्यातील जनता पाहते आहे, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला....अन् जयंत पाटलांनी भागाकार करत फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीचा 'सिलिंडर' फोडला"फडणवीस, एका ट्रेनसाठी ५० लाखांचा खर्च कसा आणि कुठून येतो?; जरा आम्हालाही सांगा"फडणवीस, तुम्हाला मोदींवर भरवसा नाय का? जयंत पाटलांचा माजी मुख्यमंत्र्यांना चिमटाविरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल"काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना