बारामती : शहरात मंगळवारी पार पडलेल्या दहीहंडी उत्सवादरम्यान रेल्वे स्टेशन मैदानात झालेल्या दगडफेक प्रकरणी 32 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर 11 जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी अनोळखी 3क् ते 4क् जणांचा या गुन्ह्यांमध्ये समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढले.
दहीहंडी ‘फोडण्याचा आमचा नंबर आला, त्या वेळी दहीहंडी खाली का घेतली नाही,’ असे म्हणून जमावाच्या मध्यभागातून संयोजकाच्या, स्टेजवरील मान्यवरांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी 32 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सूरज बाळू झगडे,अमित युवराज बांदल, तुषार धनाजी बांदल, अमित राजेंद्र बोबडे, नवनाथ विश्वनाथ जाधव, संजय प्रताप घोरपडे, महेश ज्ञानदेव फाळके, सचिन ऊर्फ अण्णा सुरेश फाळके, नाना चंद्रकांत सोनवणो, प्रशांत शरद फाळके, दादा नानासो फाळके, पप्पू फाळके, अजित बाबर, पैब्या (संपूर्ण नाव माहीत नाही), रोहित कांबळे, विनायक (संपूर्ण नाव माहीत नाही), पिंटय़ा हरिहर, गोटय़ा फाळके, पप्पू बांदल, बाळू (संपूर्ण नाव माहीत नाही), अप्पा फाळके, हर्षद दशरथ शिंदे, पप्पू शिंदे, पिसाळ, अमर फाळके, बाळू फाळके, राजा राखुंडे, श्याम पिसाळ, गाज:या, विनोद कांबळे, अजित फडतरे, संतोष मोरे यांच्यासह इतर 3क् ते 4क्
जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांपैकी 11 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बाबूराव भोसले यांनी फिर्याद दिली आहे. (वार्ताहर)
ग्रामविकासमंत्र्यांना
सुरक्षित बाहेर काढले
शहरातील रेल्वे स्थानकाच्या मैदानात योगेश भय्या मित्र मंडळाने दहीहंडी फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. या फेस्टिव्हलसाठी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणो उपस्थित होते. अचानक घडलेल्या प्रकाराने त्यांचीदेखील धावपळ उडाली. पोलिसांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढले. हा प्रकार अंतर्गत वादातून घडला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}