शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

‘दादा’ आता फौजदारी कुणावर करायची ?

By admin | Updated: December 2, 2014 00:50 IST

व्याज सवलत योजना : शासनाकडेच अडकले २६२ कोटी; जिल्हा बँका अडचणीत

राजाराम लोंढे - कोल्हापूर -व्याज सवलत योजनेंतर्गत मिळणारा परतावा गेले दोन वर्षे शासनाने जिल्हा बँकांना दिलेला नाही. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्हा बँकांचे तब्बल २६२ कोटी अडकले आहेत. शासन स्वत: पैसे देत नाही आणि शेतकऱ्यांकडून घेऊ देत नाही, अशा संकटात विकास संस्था व बँका सापडल्या आहेत. शेतकऱ्यांकडून आगाऊ व्याज घेणाऱ्या संस्थांवर फौजदारी करण्याचा इशारा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला; पण योजना जाहीर करायची आणि त्याची पूर्तता करणार नसाल तर फौजदारी करायची कोणावर, अशी विचारणा संस्थाचालकांतून होत आहे. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासन व राज्य सरकार व्याज सवलत देते. गेले आठ-दहा वर्षे शेतकऱ्यांना व्याज सवलत योजना सरकारने सुरू केली आहे. तीन लाखांपर्यंत पीक कर्ज घेऊन मुदतीत (३६५ दिवस) परतफेड केल्यास केंद्र शासन तीन टक्के परतावा देते. त्याचबरोबरएक लाखापर्यंत कर्जाची परतफेड जूनपर्यंत केल्यास राज्य शासन ३ टक्के तर एक लाख ते तीन लाखांपर्यंतच्या कर्जाच्या परतफेडीवर १ टक्के परतावा शासन बँकांना देते. योजना सुरू झाल्यानंतर विकास संस्थांनी शेतकऱ्यांकडून व्याज वसूल केले नाही. पण शासनाकडून दोन-दोन वर्षे व्याज परतावा मिळत नसल्याने संस्थांचा ताळेबंद कोलमडला. बहुतांशी विकास संस्था केवळ पीक कर्जाचे वाटप करतात, पीक कर्जाचा दर हा अत्यल्प असल्याने संस्थांना मार्जिन कमी राहतो, त्यातही व्याज दोन वर्षांनी मिळणार असेल तर संस्थांना कुलूपेच लावावी लागतील. त्यामुळे संस्थांनी शेतकऱ्यांकडून आगाऊ व्याज वसूल करण्यास सुरुवात केली. शासनाकडून व्याज जमा झाल्यानंतर ते शेतकऱ्यांना परत केले जाते. विकास संस्थांप्रमाणेच जिल्हा बॅँकांनी अशीच पद्धत राबविली आहे. शेतकऱ्यांकडून आगाऊ व्याज वसूल केल्यास विकास संस्थांच्या संचालकांवर फौजदारी करण्याचा इशारा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी कोल्हापूर जिल्हा बँकेच्या आढावा बैठकीत दिला. मंत्र्यांच्या या इशाऱ्याने सहकारक्षेत्र हादरले आहे. सहकार शुद्धिकरण करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी मंत्री पाटील यांनी घेतलेल्या भूमिका योग्यच आहे पण व्याज परताव्यामध्ये शासनच जर दोन वर्षे बॅँकांना पैसे देत नसेल व बँकांचे कोट्यवधी रुपये अडकून पडणार असतील तर बँका व विकास संस्थांनी शेतकऱ्यांना सवलत द्यायची कशी? मग संस्थांवर कारवाई करण्याचा नैतिक अधिकार शासनाला राहतो का? हेही महत्त्वाचे आहे. ..संस्था पातळीवर गोंधळकेंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनेत परतफेडीचा कालावधी वेगवेगळा आहे, त्यातच ऊस पिकाचा कालावधी सोळा ते अठरा महिने असल्याने लवकर वसूल होत नाही. परिणामी अनेक शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरतात. पात्र झालेल्या शेतकऱ्यांचे पैसे वेळेत येत नसल्याने दोन वर्षांनी वाटप करताना संस्था पातळीवर प्रचंड गोंधळ होतो.