शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

डी. वाय. पाटील यांना डी. लिट

By admin | Updated: December 24, 2014 00:54 IST

बहुमताने ठराव : शिवाजी विद्यापीठाचा निर्णय

कोल्हापूर : माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना शिवाजी विद्यापीठाची डी. लिट. ही मानद पदवी देण्याचा निर्णय आज, मंगळवारी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत घेण्यात आला. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या अधिसभेत ७५ विरुद्ध ८ अशा बहुमतांनी डॉ. पाटील यांना डी. लिट. देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते. प्राचार्य डॉ. डी. आर मोरे यांनी डी. लिट. पदवीसाठी डॉ. पाटील यांच्या नावाचा ठराव अधिसभेसमोर मांडला. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) डॉ. पाटील यांना डी. लिट. देण्याच्या ठरावाबाबत अनेक कायदेशीर त्रुटी आहेत. त्या दूर करण्यासाठी ठराव मागे घ्यावा, अशी मागणी केली. ‘सुटा’चे डॉ. आर. एच. पाटील म्हणाले, डी.लिट. पदवी केवळ व्यक्तीलाच देता येते. पदाला देता येत नाही. डॉ. डी. वाय. पाटील, राज्यपाल, बिहार अशा पदनामासह किंबहुना पदावर असणाऱ्या व्यक्तीला डी. लिट. देण्याचा प्रस्ताव अधिसभेसमोर ठेवणे चुकीचे आहे.डॉ. सविता धोंगडे म्हणाल्या, डॉ. डी. वाय. पाटील, राज्यपाल, बिहार अशा उल्लेखाचा प्रस्ताव कुलपती महोदयांकडे कुलगुरूंनी पाठविला आहे. कुलपतींनी मान्यता दिलेल्या प्रस्तावात डॉ. डी. वाय. पाटील, राज्यपाल, बिहार अशा नावाचा आहे. याच नावास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली असून, याच नावास पदनामासह मान्यता द्यावी, असा प्रस्ताव सिनेटसमोर ठेवला आहे. विद्यापीठाच्या इतिहासात अशाप्रकारे पदनामासह आतापर्यंत कोणालाही पदवी दिलेली नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ही ऐतिहासिक चूक केलेली आहे. सिनेट ही पूर्णत: तांत्रिक स्वरूपात चालत असल्याने व वरील सर्व तांत्रिक बाबी विचारात घेता पाटील यांना डी.लिट. देण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा. यावर प्रशासकीय बाजू मांडताना ‘बीसीयुडी’चे संचालक डॉ. अर्जुन राजगे म्हणाले, विद्यापीठाने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. सर्वांचे मार्गदर्शन घेऊनच हा प्रस्ताव तयार करून कुलपती कार्यालयाकडे पाठविला. त्यांना जेव्हा डी.लिट देण्याचा प्रस्ताव होता तेव्हा ते राज्यपाल होते. त्यानंतर कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी सर्व तांत्रिकबाबी तपासूनच प्रस्ताव तयार केला असून तो योग्य असल्याचे सभागृहाला सांगितले. राजगे यांचे स्पष्टीकरण केल्यानंतरही सदस्यांचे समाधान न झाल्याने ठरावाबाबत मतदान घेण्याचा निर्णय झाला. यात डॉ. पाटील यांना डी.लिट. द्यावी, यासाठी ७५ जणांनी हात उंचावून सहमती दिली. याप्रसंगी प्र-कुलगुरु डॉ. अशोक भोईटे, प्रभारी कुलसचिव सी. एस. कोतमिरे यांच्यासह अधिसभा सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)