शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या हत्येचा कट उधळला!

By admin | Updated: November 18, 2014 03:05 IST

गुन्हे शाखेच्या मोटार वाहन चोरीविरोधी पथकाने बॉलीवूडमधील नामवंत दिग्दर्शक व निर्मात्याच्या हत्येचा कट उधळून लावला आहे

मुंबई : गुन्हे शाखेच्या मोटार वाहन चोरीविरोधी पथकाने बॉलीवूडमधील नामवंत दिग्दर्शक व निर्मात्याच्या हत्येचा कट उधळून लावला आहे. गँगस्टर रवी पुजारीने या संभाव्य हत्याकांडाचे आदेश दिले होते. त्यानुसार दिग्दर्शकाच्या निवासस्थानाची पाहणी करून, त्याच्या दिनक्रमाची इत्थंभूत माहिती काढून हत्याकांडाची आखणी करणाऱ्या पुजारी टोळीच्या १३ जणांना गुन्हे शाखेने अटक केली. विशेष म्हणजे अटक केलेल्या टोळीतल्या एका गटाने आॅगस्ट महिन्यात बॉलीवूड निर्माते करीम व अली मोरानी यांच्या निवासस्थानी गोळीबार केला होता, असे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या गोळीबारात सहभागी असलेल्यांना त्याही गुन्ह्यात अटक केली जाणार आहे.वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारा, सामाजिक विषयांमध्ये बोलणारा, सामाजिक आंदोलनांमध्ये भाग घेणारा अशी ओळख असलेल्या या दिग्दर्शकाला नुसते घाबरवू नका तर त्याला किंवा दिग्दर्शक असलेला त्याचा भाऊ किंवा कुटुंबापैकी कोणीही सापडल्यास हत्या करा, असे आदेश पुजारीने आपल्या टोळीला दिले होते. त्यामुळे हत्याकांड घडविण्यासाठी या दिग्दर्शकाच्या निवासस्थान, तेथील सुरक्षा, त्याचा नित्यक्रम जाणून घेण्यासाठी टोळीने दोन ते तीन वेळा रेकी केली होती. त्यानुसार कट आखून १५ नोव्हेंबरला रात्री ८च्या सुमारास टोळीतले ९ जण खार, ११व्या रस्त्यावरील मधुपार्क इमारतीत गोळा झाले होते.या दिग्दर्शकाच्या हत्येसाठी पुजारी टोळी धडपड करते आहे अशी कुणकुण मोटार वाहन चोरीविरोधी पथकाचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक जगदीश साईल यांना मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार साईल, गुन्हे गुप्तवार्ता विभागाचे धीरज कोळी आणि पथकाने मधुपार्क येथे आधीच सापळा रचला. टोळी तेथे आल्याची खात्री पटताच पथकाने छापा घालून त्यापैकी सात जणांना गजाआड केले. प्राथमिक चौकशीत दिग्दर्शकाची हत्या, हत्येत सहभागी असलेले अन्य साथीदार यांची माहिती काढून पथकाने दोन दिवसांत १३ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ४ पिस्तुले आणि ७.६५ बोअरची २० जिवंत काडतुसे हस्तगत केली. (प्रतिनिधी)