शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

जातपंचायतीच्या २० खंडणीखोरांवर गुन्हा

By admin | Updated: November 21, 2014 02:00 IST

न्यायालयात निर्दोष सुटका होवूनही परंपरागत निवाड्याच्या नावाखाली एका विधवा महिलेकडून १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या ‘जात पंचायत’च्या मुख्य पंचासह २० जणांविरूध्द पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर (अहमदनगर) : न्यायालयात निर्दोष सुटका होवूनही परंपरागत निवाड्याच्या नावाखाली एका विधवा महिलेकडून १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या ‘जात पंचायत’च्या मुख्य पंचासह २० जणांविरूध्द पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. २२ डिसेंबर २००६ रोजी अहमदनगर येथील वैदू समाजाच्या शांताबाई शिंदे यांचे पती मारूती शिंदे यांचा खून झाला. शांताबार्इंना आपल्या पतीच्या खुनाचा संशय ज्यांच्यावर होता, त्यांनीच शांताबाईसह इतर दोघांविरूध्द फिर्याद दिली. न्यायालयाने खुनाच्या आरोपातून शांताबाईसह दोघांची निर्दोष सुटका केली. मात्र जात पंचायतीने परंपरागत न्याय-निवाडा करण्यासाठी आधी तिघांकडून प्रत्येकी ३० हजार घेतले. पुन्हा काही दिवसांनी प्रत्येकी २ लाख ३० हजार रूपयांचा दंड वसूल केला. इतकेच नव्हे तर त्यांना जातीतून बहिष्कृत करण्यात आले. शांताबार्इंना पुन्हा जातीत घेण्यासाठी चक्क १५ लाखांची मागणी पंचांनी केली होती. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षा अ‍ॅड. रंजना गवांदे, जात पंचायत मूठमाती अभियानाचे संयोजक कृष्णा चांदगुडे व विलास कांगुणे यांच्या मदतीने शांताबार्इंनी जात पंचायतीचे मुख्य पंच चंदर बापू दासरजोगी व इतर २० पंचांच्या विरोधात लोणी पोलिसांत तक्रार दिली. तीन दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी मुख्य पंच चंदर बापू दासरजोगी, राजा शिंदे, मारूती शिंदे, अंबू शिंदे, बाबू धनगर, मारूती शिंदे, बापू शिंदे, साहेबराव शिंदे, शामराव शिंदे, बापू लोखंडे, हुसेन शिंदे, मल्लू शिंदे, शामलींग शिंदे, नागेश शिंदे, तायगा शिंदे, राजू , अमृत अण्णा पवार, दशरथ शिंदे व खरग्या उर्फ ढवळ्या शंकर शिंदे अशा एकूण २० जणांविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)