शहरं
Join us  
Trending Stories
1
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
2
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
3
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
4
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
6
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
7
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
8
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
9
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
10
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
11
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
12
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
13
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
14
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
15
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
16
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
17
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
18
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
19
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
20
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या प्रगतीचे श्रेय शास्त्रज्ञांना

By admin | Updated: May 28, 2015 00:40 IST

मंगळयान मोहिमेसारखी आव्हानात्मक मोहिम यशस्वीरित्या पूर्ण करुन शास्त्रज्ञांनी देशाचे नाव उंचावले आहे. या मोहिमेतून झालेल्या देशाच्या प्रगतीचे श्रेय शास्त्रज्ञांना द्यावे लागेल,

पुणे : मंगळयान मोहिमेसारखी आव्हानात्मक मोहिम यशस्वीरित्या पूर्ण करुन शास्त्रज्ञांनी देशाचे नाव उंचावले आहे. या मोहिमेतून झालेल्या देशाच्या प्रगतीचे श्रेय शास्त्रज्ञांना द्यावे लागेल, असे मत पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा.डॉ.अरुण निगवेकर यांनी व्यक्त केले. निनाद, पुणेतर्फे उषा भालचंद्र केसरी स्मरणार्थ १० वा विज्ञाननिष्ठ स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार मंगळयान मोहिमेत योगदान देणारे शास्त्रज्ञ नितीन घाटपांडे यांना डॉ.निगवेकर यांच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आला. महापालिका उपायुक्त सुनिल केसरी, चंद्रकांत सणस, माजी नगरसेविका शुभदा जोशी, निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी, मयुरेश जोशी, अनुप जोशी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या सचिन फडतरे, सचिन लहामगे, शुभांगी रणदिवे यांचा सत्कार करण्यात आला. घाटपांडे म्हणाले, सरकारकडून प्रत्येक व्हिजनला महत्त्व दिले जाते. परंतु ते व्हिजन मिशन व्हावे, याकरीता मंगळयान मोहिमेच्या माध्यमातून इस्त्रोने पाऊल उचलले. त्यामुळे ही मोहिम यशस्वी होऊ शकली.उदय जोशी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)नितीन घाटपांडे यांनी जबाबदारी पेलली४डॉ. निगवेकर म्हणाले, ‘‘मंगळयान मोहिमेंतर्गत तेथील माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी, याकरीता यानावर अनेक यंत्रे बसविण्यात आली. परंतु ती कशा प्रकारे चालवायची, हे महत्त्वाचे होते. त्याकरीता सातत्याने उर्जा देणाऱ्या सूर्याच्या शक्तीशिवाय पर्याय नाही, हे शास्त्रज्ञांनी ओळखले आणि सौर उर्जेद्वारे ही यंत्रे कार्यान्वित करण्यात आली. सौर उर्जेची जबाबदारी पुण्याचे नितीन घाटपांडे यांनी यशस्वीपणे पार पाडली याबद्दल आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत.