शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थांमधून बनावट नोटा

By admin | Updated: September 26, 2016 03:04 IST

जिल्ह्यात येणाऱ्या बनावट नोटांचे कलेक्शन पतसंस्थांमधून होत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या रॅकेटमधील पाचव्या आरोपीला शनिवारी

अहमदनगर : जिल्ह्यात येणाऱ्या बनावट नोटांचे कलेक्शन पतसंस्थांमधून होत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या रॅकेटमधील पाचव्या आरोपीला शनिवारी मुंबई येथील एका पतसंस्थेच्या शाखेतून ताब्यात घेतले. तेथे लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या उद्धव सुभाष नांगरे (३१, रा़ देडगाव ता़ नेवासा) याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़नगर येथील एका पतसंस्थेच्या विविध शाखांमधून या बनावट नोटा एकत्र केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे़ पोलिसांना मिळालेल्या महितीवरून १७ आॅगस्टला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संतोष गवारे (३३, रा़ सोनई) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे २ लाख ९ हजारांच्या बनावट नोटा आढळून आल्या. त्यामध्ये एक हजार व पाचशे रुपयांचे बंडल होते़ पोलिसांनी गवारेकडे चौकशी केल्यानंतर त्याने उर्वरित साथीदारांचीही नावे सांगितली.पोलिसांनी नगर बस स्थानक व शेवगाव येथून विलास प्रभाकर प्रधान (२८, रा़ घोडेगाव), प्रवीण शशिकांत राऊत (२३, रा़ केडगाव) यांच्यासह शाहीद शेख यास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आणखी एक सूत्रधार उद्धव नांगरे याचे नाव समोर आले. आणखी पतसंस्थांमधून बनावट नोटांचे कलेक्शन केले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे़ कर्मचाऱ्यांचे कारस्थान नांगरे हा नगर येथील एका पतसंस्थेच्या मुंबई शाखेत लिपिक आहे. विलास प्रधान हा त्याच पतसंस्थेच्या शेवगाव शाखेत होता. शेख हासुद्धा एका पतसंस्थेत नोकरीला होता़ प्रधानच्या माध्यमातून प्रवीण राऊत या रॅकेटमध्ये सामील झाला़ नगर येथील एका पतसंस्थेच्या जिल्ह्यासह राज्यात सात ते आठ शाखा आहेत़ या पतसंस्थेचे दिवसभराचे दीड ते दोन कोटी रुपये कलेक्शन आहे़ कलेक्शनमधून आलेल्या बनावट नोटा बाजूला काढल्या जातात़