शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार पोलिसांचा मोजणार भावनांक

By admin | Updated: May 6, 2015 03:51 IST

वाकोला गोळीबारासारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलीस दलातल्या ४० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भावनांक किंवा भावनिक परिपक्वता तपासली जाणार आहे.

जयेश शिरसाट,  मुंबईवाकोला गोळीबारासारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलीस दलातल्या ४० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भावनांक किंवा भावनिक परिपक्वता तपासली जाणार आहे. त्यानंतर गरजेनुसार मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशनही लाभणार आहे. या तपासणीत आयुक्त राकेश मारिया यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही भावनांकाचे विश्लेषण होणार आहे. भावनांक तपासण्याची ही कवायत सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. भारती यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार आयुक्तांपासून शेवटच्या पोलीस शिपायापर्यंत सर्वांकडून एक फॉर्म भरून घेतला जाईल. या फॉर्ममध्ये मानसोपचार तज्ज्ञांनी काढलेले प्रश्न असतील. या प्रश्नांच्या उत्तरांवरून प्रत्येकाचा भावनांक मोजला जाईल. त्यानंतर गरजेनुसार मानसोपचार तज्ज्ञ प्रत्येकाचे समुपदेशन करतील. तसेच भावनांवर नियंत्रण (पान ६ वर)मिळविण्यासाठीचे उपाय सुचवतील. मानसोपचारतज्ज्ञांच्या याच समितीकडून पोलिसांचा भावनांक मोजण्यासाठी आवश्यक असलेले प्रश्न ठरविणार आहे. त्यातून एखाद्या अधिकारी-कर्मचाऱ्याच्या भावनांचा उद्रेक होतो का, त्याला भावना आवरता येत नाहीत का, भावनेच्या भरात तो हिंसक होतो आणि पुढलामागचा विचार न करता तो कृती करतो का, हे मानसोपचार तज्ज्ञ जाणून घेणार आहेत.मारिया यांनी पोलीस आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर त्यांनी अशाप्रकारे पोलिसांचा भावनांक मोजता येईल, असे सांगितले होते. त्यांची ती सूचना योजनेचे स्वरूप घेत असतानाच वाकोला प्रकरण घडल्याने या योजनेची अमलबजावणी तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.दरम्यान, मुंबई विद्यापिठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गौतम गवळी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पोलिसांच्या भावनांकासोबत भावनिक परिपक्वताही तपासणे आवश्यक आहे. दुसऱ्याने व्यक्त केलेल्या भावना समजून घेणे आणि स्वत:च्या भावना दुसऱ्याला समजतील अशा व्यक्त करणे याला इमोशनल इंटेलीजन्स किंवा भावनिक परिपक्वता म्हणतात. पोलिसांना कॉन्फ्लीक्ट मॅनेजमेन्टचे (संघर्ष परिस्थितीतील व्यवस्थापन) धडे देणे आवश्यक असल्याचे डॉ. गवळी सांगतात. पोलिसांच्या आयुष्यात दररोज मानसिक संघर्षाची परिस्थिती उद्भवते. शिवाय पोलीस सशस्त्र असतात. त्यामुळे भावनिक संतुलन बिघडल्यास वाकोला गोळीबारासारखे प्रकार घडू शकतात.उपाययोजना करण्यावर भरशारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस दलात भावनांक मोजून तो नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे.- देवेन भारती, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था)