शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कापूस उद्योगाला घरघर!

By admin | Updated: December 20, 2014 00:22 IST

जिनिंग आणि प्रेसिंगचे २२९ युनिट बंद : कापसाला वाढीव भावाची प्रतिक्षा.

नीलेश शहाकार/बुलडाणा : कापसाला वाढीव भाव मिळेल या आशेने अनेक शेतकर्‍यांनी या हंगामात कापूस विक्रीसाठी आणला नाही. शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याने राज्यातील २२९ जिनिंग आणि प्रेसिंग अद्यापही सुरूच झाल्या नाहीत. व्यापार्‍यांनी कापसाला प्रति क्विंटल ४७00 रुपये खरेदी भाव दिल्याने दररोज हजारो ट्रक कापूस राज्याबाहेर रवाना होत आहे. त्याचा फटका स्थानिक जिनिंग प्रेसिंग उद्योगाला बसला असून, हा उद्योगच अडचणीत सापडला आहे. २0१४-१५ साठी केंद्र सरकारने कापसासाठी प्रति क्विंटल ४0५0 रुपये आधारभूत दर ठरविलेला आहे. जिनिंग प्रेसिंगमध्ये कापसासाठी ३९00 रुपये भाव आहे; मात्र महाराष्ट्रातील कापूसाला इतर राज्यांसह आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाव मिळतो. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना भाववाढीची प्रतिक्षा आहे. याच कारणामुळे शेतकरी आपला कापूस जिनिंग प्रेसिंगमध्ये आणत नसल्याचे चित्र आहे. राज्यभरात खाजगी व सहकारी क्षेत्रातील ८६७ जिनिंग आणि प्रेसिंग युनिटस आहे; मात्र यातील केवळ ६६८ युनिटस सुरु असून, २२९ युनिट बंद असल्याचे महाराष्ट्र राज्य पणन संचालनालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. यावर्षी अनियमित पावसामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. कोरडवाहू शेतीतील कापसाची वेचणी संपली आहे. त्यातच लाल्या रोगामुळेही उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या कमी उत्पादनाचाही फटका जिनिंग उद्योगाला बसला आहे. . जिनिंग प्रेसिंग उद्योगांची स्थिती चालूबंदएकूण खाजगी५९१३0६२१ सहकारी७११९९२७६ एकूण६६८२२९८६७