शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: आता सलून, ब्युटी पार्लर्सदेखील सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार; हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 22:13 IST

ठाकरे सरकारचा निर्णय घेण्याच्या तयारीत; लवकरच नव्या नियमाची अंमलबजावणी होण्याची शक्यता

मुंबई: मोदी सरकारनं लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात विविध दुकानं आणि सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता ठाकरे सरकारनंदेखील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हळूहळू निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. परवापासून म्हणजेच २९ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारनं मद्यविक्रीला परवानगी दिली, त्यावेळीच सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्याची मागणी सुरू झाली. मात्र गर्दी होईल म्हणून राज्य सरकारनं याबद्दलचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. मात्र आता २९ मेपासून राज्यातील सलून आणि पार्लर सुरू होण्याची शक्यता आहे. सलून आणि पार्लर्स सुरू करताना चालकांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेतच सलून आणि पार्लर्स सुरू ठेवण्याची परवानगी असेल. सलून, पार्लर्समध्ये ग्राहकांना थेट येता येणार नाही. त्यांना त्यासाठी अपॉईंटमेंट घ्यावी लागेल. या ठिकाणी केवळ अत्यावश्यक सेवा (हेअर कट, हेअर डाय, वॅक्सिंग, थ्रेंडिंग) उपलब्ध असतील. सलून, पार्लर्समध्ये अत्यावश्यक नसलेल्या सेवा (दाढी, फेशियल, क्लेन्सिंग, ब्लिचिंग आणि त्वचेशी संबंधित इतर सेवा) सुरू करण्याची परवानगी नसेल, अशी नियमावली सरकारकडून घालून दिली जाऊ शकते.

सलून, पार्लर्स ५० टक्के क्षमतेनंच चालवली जावीत, असा नियम राज्य सरकारकडून लागू केला जाऊ शकतो. कर्मचारी आणि ग्राहकांसाठी इन्फ्रा रेड थर्मामीटर्सचा वापर करण्यात यावा आणि एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणं आढळून आल्यास त्याला प्रवेश देऊ नये. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. ग्राहकांनी ग्लोव्ह्ज आणि ऍप्रन वापरावं. सलून, पार्लर्सच्या प्रवेशद्वाराजवळ हँड सॅनिटायझर ठेवावं. प्रत्येक वापरानंतर खुर्ची, क्युबिकल्स सॅनिटाईज कराव्यात. ग्राहकांसाठी विल्हेवाट लावण्याजोगं टॉवेल, नॅपकिन वापरावं. विल्हेवाट लावण्याजोगं टॉवेल, नॅपकिन न वापरल्यास प्रत्येक वापरानंतर ते सॅनिटाईज करावं, अशा सूचना शासनाकडून दिल्या जाऊ शकतात.

VIDEO: तुमच्यात हिंमत असेल तर सरकार पाडाच; शिवसेनेच्या मंत्र्यांचं भाजपाला थेट आव्हान

...अन् जयंत पाटलांनी भागाकार करत फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीचा 'सिलिंडर' फोडला

"फडणवीस, एका ट्रेनसाठी ५० लाखांचा खर्च कसा आणि कुठून येतो?; जरा आम्हालाही सांगा"

फडणवीस, तुम्हाला मोदींवर भरवसा नाय का? जयंत पाटलांचा माजी मुख्यमंत्र्यांना चिमटा

विरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

"काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस