शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : राज्यातील आकडेवारी नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या १ लाखाहून अधिक मुलांना कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 07:21 IST

CoronaVirus News: सर्वाधिक संसर्ग हा ३१ ते ४० वयोगटात झाला असून, ही रुग्णसंख्या ७ लाख १२ हजार २१५ इतकी आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत ती २१.५३ टक्के आहे.

मुंबई : काेरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्गाचा वेग जास्त असून, तरुण, वृद्धांसोबतच लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे धक्कादायक निरीक्षण समोर आले आहे. दररोज येणाऱ्या नव्या बाधितांमध्ये सरासरी ५ ते ७ टक्के रुग्ण ही लहान बालके असल्याचे आढळून आले आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, राज्यात नवजात बालक ते दहा वर्षांपर्यंतच्या १ लाख १ हजार ८०९ बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ३.०९ टक्के आहे.११ ते २० वयोगटात २ लाख २० हजार १०४ मुला-मुलींना कोरोना झाला असून, राज्यातील काेराेनाच्या एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ६.०६ टक्के आहे. सर्वाधिक संसर्ग हा ३१ ते ४० वयोगटात झाला असून, ही रुग्णसंख्या ७ लाख १२ हजार २१५ इतकी आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत ती २१.५३ टक्के आहे.पहिल्या लाटेत लहान मुलांना काेरोना होण्याचे प्रमाण कमी होते; परंतु आता हे प्रमाण वाढले आहे. काेरोनाचा नवा स्ट्रेन तीव्र स्वरूपाचा, लवकर पसरणारा आणि मृत्यूचे प्रमाण वाढविणारा आहे. पालक लहान मुलांना घराबाहेर घेऊन जातात.    आवारात मुलांची गर्दी जमताना पहायला मिळत आहे. मुले एकत्र खेळतात. यामुळे त्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण आता वाढले आहे. शिवाय कोरोना विषाणूनेही स्वरूप बदलल्याचा फटका लहान मुलांना बसू लागल्याचे मत बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले.

अशी घ्या काळजीमुलांनी हात चांगले धुतले की नाही हे पाहावे. त्यांना साबण, कोमट पाणी आणि अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझरने हात स्वच्छ करायला सांगावे. तोंडाला चांगल्या प्रकारचा मास्क लावावा. शक्य ताे त्यांना बाहेर नेऊ नये. बाहेर गेल्यास मुले ताेंडाला लावलेला मास्क काढणार नाहीत याची काळजी घ्यावी. आपल्या बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला सतत स्पर्श करू नये. प्राण्यांपासून लांब राहावे, मिठाचे सेवन करणे टाळावे. बाहेरचे खाद्यपदार्थ घेणे टाळावे. शिंकताना, खोकताना तोंडावर रुमालाचा वापर करावा. भरपूर पेय घेणे. भरपूर विश्रांती घ्यावी.

पालकांनी अधिक जबाबदारीने वागणे गरजेचेकोरोनाच्या पहिल्या लाटेत दोन टक्के मुले पॉझिटिव्ह येत होती. आता ही संख्या ७ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. याचे एक कारण व्हायरसमध्ये झालेले म्युटेशन असू शकते. गेल्या वर्षीच्या तुलनेत आता मुले लोकांमध्ये जास्त मिसळू लागली आहेत. कामानिमित्त बाहेर असणाऱ्या मोठ्या व्यक्तींशी मुलांचा संपर्क वाढला आहे. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मुलांमध्ये इतर वयोगटांच्या तुलनेत काेराेना मृत्यूदर फार कमी आहे. पालकांनी अधिक जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.- डॉ. किशोर दालमिया, बालरोगतज्ज्ञ 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस