CoronaVirus News :अशोक चव्हाण उपचारांसाठी मुंबईकडे; अ‍ॅम्ब्युलन्स निघतानाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 02:30 PM2020-05-25T14:30:55+5:302020-05-25T14:40:51+5:30

CoronaVirus News : अशोक चव्हाण उपचारासाठी आज नांदेडहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

CoronaVirus News : Minister Ashok Chavan leaves for Mumbai treatment on corona virus vrd | CoronaVirus News :अशोक चव्हाण उपचारांसाठी मुंबईकडे; अ‍ॅम्ब्युलन्स निघतानाचा व्हिडीओ व्हायरल

CoronaVirus News :अशोक चव्हाण उपचारांसाठी मुंबईकडे; अ‍ॅम्ब्युलन्स निघतानाचा व्हिडीओ व्हायरल

Next

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या अशोक चव्हाणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण हे मुंबईतून नांदेडला गेले होते. तिथे त्यांनी कोरोना चाचणी केली असता काल त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

विधान परिषद निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी ते मुंबईला आले होते. या निवडणुकीनंतर ते पुन्हा नांदेडला परतले. नांदेडला येऊन त्यांनी स्वत: होम क्वारंटाइन करून घेतलं होतं. त्यांनी कुटुंबापासून स्वत:ला वेगळं ठेवलं होतं.  नांदेडमधील रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ते उपचारासाठी आज नांदेडहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. अशोक चव्हाण मुंबईत पोहोचतील. त्यानंतर मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातील.

हेही वाचा

CoronaVirus News : चीनमध्ये पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना; आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यानं आठवड्याभरात वाढले 3500 रुग्ण, केजरीवालांची कबुली

CoronaVirus News: ब्रिटनमध्ये सप्टेंबर अन् अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये संपणार कोरोनाचा प्रभाव, अभ्यासात खुलासा

भारताची डोकेदुखी आणखी वाढणार; नेपाळ सीमेवर रस्ता तयार करणार 

Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊल

मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला

Web Title: CoronaVirus News : Minister Ashok Chavan leaves for Mumbai treatment on corona virus vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.