CoronaVirus News : चीनमध्ये पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना; आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 01:49 PM2020-05-25T13:49:26+5:302020-05-25T13:51:21+5:30

CoronaVirus News : गेल्या 10 दिवसांत वुहानमध्ये 60 लाखांहून अधिक लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे.

coronavirus coming once again in china 51 new cases found vrd | CoronaVirus News : चीनमध्ये पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना; आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले

CoronaVirus News : चीनमध्ये पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना; आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले

Next

बीजिंग: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूची बाधा झालेली प्रकरणं वेगानं वाढू लागली आहेत. चीनमध्ये कोरोनाचे एका दिवसात 51 नवीन रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी 40 रुग्णांमध्ये कोरोना संक्रमणाची लक्षणं नाहीत. चीन देशात कोरोनाचे बहुतेक नवीन रुग्ण हे वुहानमध्येच सापडले आहेत. गेल्या 10 दिवसांत वुहानमध्ये 60 लाखांहून अधिक लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे.

देशाच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) म्हटले आहे की, रविवारी चीनमधील नवीन कोरोना प्रकरणे लोकल ट्रान्समिशनशी संबंधित नाहीत. पण यातील 11 नवीन प्रकरणे बाहेरील आहेत. मंगोलिया स्वायत्त प्रदेशातून आलेले 10 रुग्ण  आणि एक सिचुआन प्रांतातून आलेल्या एका रुग्णाचा यात समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गाच्या 40 नव्या रुग्णांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. त्यापैकी 38 प्रकरणं वुहानमधील आहेत. वुहानमधील कोरोनाची लक्षणं न आढळता पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची प्रकरणे लक्षात घेता सरकारने चाचण्यांचा टप्पा वाढवला आहे. आरोग्य विभागाच्या मते, 396 लोक ज्यांना संसर्गाची कोणतीही लक्षणं नाहीत ते चीनमध्ये वैद्यकीय देखरेखीखाली आहेत, त्यापैकी 326 वुहानमधील आहेत. असे रुग्ण आहेत ज्यांच्यात कोरोना संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, ज्यांना संसर्ग आहे, परंतु त्यांना ताप, सर्दी किंवा घसा खवखवण्याची लक्षणे नाहीत, तरीसुद्धा ते दुसर्‍या व्यक्तीस संक्रमित करू शकतात.
वुहान महानगरपालिका आरोग्य आयोगाच्या माहितीनुसार, 14 मे ते 23 मेदरम्यान शहरात आतापर्यंत 60 लाखांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. रविवारपर्यंत चीनमध्ये 82,985 लोकांना संसर्ग झाला असून, त्यातील 4,634 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यानं आठवड्याभरात वाढले 3500 रुग्ण, केजरीवालांची कबुली

CoronaVirus News: ब्रिटनमध्ये सप्टेंबर अन् अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये संपणार कोरोनाचा प्रभाव, अभ्यासात खुलासा

भारताची डोकेदुखी आणखी वाढणार; नेपाळ सीमेवर रस्ता तयार करणार 

Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊल

मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला

Web Title: coronavirus coming once again in china 51 new cases found vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.