CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यानं आठवड्याभरात वाढले 3500 रुग्ण, केजरीवालांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 01:15 PM2020-05-25T13:15:23+5:302020-05-25T13:21:43+5:30

CoronaVirus : चिंता करण्याची कोणतीही गोष्ट नाही. कोरोनानं मृत्यू होणाऱ्यांची संख्या कशी कमी होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

arvind kejriwal said corona not going today or tomorrow the government has a total of 3500 vrd | CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यानं आठवड्याभरात वाढले 3500 रुग्ण, केजरीवालांची कबुली

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यानं आठवड्याभरात वाढले 3500 रुग्ण, केजरीवालांची कबुली

Next

नवी दिल्लीः कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढत असून, केंद्रासह अनेक राज्य सरकारे कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. कोरोना हा आज किंवा उद्या जाणारा आजार नाही. लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यामुळे राजधानीत कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, आठवड्याभरात 3500 रुग्ण वाढले आहेत. परंतु चिंता करण्याची कोणतीही गोष्ट नाही. कोरोनानं मृत्यू होणाऱ्यांची संख्या कशी कमी होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या हॉस्पिटलला 'कारणे दाखवा' नोटिस बजावली आहे. COVID19 च्या रुग्णांना अॅम्ब्युलन्सने कोविड हॉस्पिटलला पोहोचवणं हे रुग्णालयाचं कर्तव्य आहे. लॉकडाऊन शिथील केल्यामुळे दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. मात्र, जोवर मृत्यूदर किंवा गंभीर प्रकरणांची संख्या वाढत नाही, तोवर काळजीचं कारण नाही. दिल्लीतील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील मिळून 4,500 बेड्स तयार आहेत, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी दिली आहे.


दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आजपर्यंत दिल्लीत 13 हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत, परंतु आतापर्यंत 6 हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत. दिल्लीतील सरकारी रुग्णालयात 3829  बेड आहेत, त्यापैकी बर्‍याच जणांना ऑक्सिजनची सुविधाही पुरविण्यात आली आहे. यापैकी दीड हजार बेड वापरण्यात आले आहेत, उर्वरित बेड्स रिकामी आहेत. आमच्याकडे दोनशेहून अधिक व्हेंटिलेटर आहेत, त्यापैकी 11 वापरले गेले आहेत. खासगी रुग्णालयांमधील 600 हून अधिक बेड्स कोरोनासाठी देण्यात आले आहेत. तर 2000 पेक्षा जास्त बेड खासगी रुग्णालयात राखीव ठेवण्यात आले आहेत.

 

हेही वाचा

CoronaVirus News: ब्रिटनमध्ये सप्टेंबर अन् अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये संपणार कोरोनाचा प्रभाव, अभ्यासात खुलासा

भारताची डोकेदुखी आणखी वाढणार; नेपाळ सीमेवर रस्ता तयार करणार 

Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊल

मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला

Web Title: arvind kejriwal said corona not going today or tomorrow the government has a total of 3500 vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.