शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

CoronaVirus News in Maharashtra : राज्यात २४ तासांत ६३ हजारांहून अधिक रुग्ण, तर  ३४९ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 1:29 AM

CoronaVirus News in Maharashtra : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६५ टक्के असून मृत्यूदर १.७ टक्के आहे. राज्यात रविवारी ३४ हजार ८ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

मुंबई : राज्यात २४ तासांत ६३ हजार २९४ रुग्णांची नोंद झाली असून ३४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मागील काही दिवसांत दैनंदिन रुग्ण व मृत्यूंत झालेली ही विक्रमी नोंद आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३४ लाख ७ हजार २४५ झाली असून मृतांचा आकडा ५७ हजार ९८७ झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६५ टक्के असून मृत्यूदर १.७ टक्के आहे. राज्यात रविवारी ३४ हजार ८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून  सध्या राज्यात ३१ लाख ७५ हजार ५८५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २५ हजार ६९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.दिवसभरात नोंद झालेल्या ३४९ मृत्यूंमध्ये मुंबई ७९, ठाणे १, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा ५, उल्हासनगर मनपा १, भिंवडी निजामपूर मनपा १, मीरा भाईंदर मनपा ४, रायगड १, पनवेल मनपा ५, नाशिक १७, नाशिक मनपा ३, अहमदनगर ६, अहमदनगर मनपा ५, जळगाव ५, जळगाव मनपा १, नंदूरबार १, पुणे ६, पुणे मनपा ७, पिंपरी चिंचवड मनपा ३, सोलापूर ३, सोलापूर मनपा १, सातारा ८, कोल्हापूर मनपा २, सांगली १, सांगली मिरज कुपवाड मनपा १६, सिंधुदुर्ग ४, औरंगाबाद १६, औरंगाबाद मनपा २०, जालना ५, हिंगोली ३, परभणी ८, परभणी मनपा ४, लातूर ३, लातूर मनपा १, उस्मानाबाद ७, बीड ११, नांदेड ८, नांदेड मनपा ३, अकोला २, अमरावती १, अमरावती मनपा १, यवतमाळ २, बुलढाणा ४, वाशिम २, नागपूर ७, नागपूर २७, वर्धा २, भंडारा १, गोंदिया ९, चंद्रपूर ११, चंद्रपूर मनपा २, आणि अन्य राज्य/देशातील २ रुग्णांचा समावेश आहे.

११ ते १२ जिल्ह्यांत खाटा उपलब्ध नाही४ एप्रिल ते १० एप्रिल असे एका आठवड्यात ४ लाख रुग्ण राज्यात आढळले. तर १९८२ मृत्यू झाले. सध्या मृत्यू दर ०.५ टक्के इतका असून तो वाढतोय. गेल्या महिन्यात १४ मार्च ते २० मार्च या आठवड्यात १.५ लाख रुग्ण होते. सध्या पॉझिटीव्हिटी दर २६ टक्के असून जितक्या जास्त चाचण्या करतो आहोत तितका हा दर वाढतो आहे. शनिवारी २ लाख ६० हजार चाचण्या केल्या. यात १ लाख एन्टीजेन चाचण्या होत्या. सध्या २० हजार २५० आयसीयू बेड्स पैकी ७५ टक्के भरले असून ६७ हजार ऑक्सिजन बेड्स पैकी ४० टक्के भरले आहेत. जवळपास ११ ते १२ जिल्ह्यात खाटा उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती असल्याची माहिती आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस