शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : सिनेमा, मालिकांचे चित्रीकरण ३१ मार्चपर्यंत रद्द, निर्मात्यांचे कोट्यवधींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 06:00 IST

रविवारी मुंबईत फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

- अजय परचुरेमुंबई : कोरोना व्हायरसचा वाढत धोका पाहता येत्या गुरुवारपासून ३१ मार्चपर्यंत सिनेमा, छोटा पडदा, वेबसिरीज आणि जाहिराती या सर्वमनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घटकांचे संपूर्ण चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी मुंबईत फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान निर्मात्याला होणार आहे. तसेच या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या अनेक कामगारांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे .कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली होती. येत्या काही आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत . ह्याच पार्श्वभूमीवर सिनेक्षेत्राशी संबंधित असणाºया सर्व संघटनांनी एकत्र येऊन खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. सिनेमांचे तसेच मालिकांचे दिवस रात्र सुरू असणारे चित्रीकरण ज्या ठिकाणी होते तिथे अनेक लोक एकत्र येऊन काम करत असतात. गर्दीमुळे यांनाही कोरोनाची संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे यावर नियंत्रण राहावे म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे, असे निर्माते अशोक पंडित यांनी सांगितले.दोन दिवसांत आटपून घ्या...याचा परिणाम मराठी सिनेमा आणि डेलीसोप यांच्या चित्रीकरणावरही होणार आहे. ठरलेल्या नियोजनात त्यांना मोठे बदल करावे लागणार आहेत. येत्या दोन दिवसांत आधी ठरवल्याप्रमाणे राहिलेले चित्रीकरण पूर्ण करून गुरुवारपासून ३१ मार्चपर्यंत संपूर्ण चित्रीकरणाला ब्रेक देण्यात येणार आहे. गुरुवारपासून गोरेगाव चित्रनगरी, मढ, ठाणे, मिरा रोड या भागातील स्टुडिओ, बंगले येथे कोणतेही चित्रीकरण होणार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाcinemaसिनेमा