शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

CoronaVirus News: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 42 हजारांच्या पुढे, दिवसभरात 4 हजार 161 जण बरे होऊन घरी परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 10:22 PM

राज्यात एकूण 73,792 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 62,354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत”.

ठळक मुद्देराज्यातील एकूण 73,792 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 62,354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेतदेशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 4 लाख 50 हजारचा टप्पाही ओलांडला आहे. 

मुंबई : राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. चिंतेची बाब म्हणजे, राज्यातील नव्या रुग्णांची संख्या रोज नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 3 हजार 890 नवे रुग्ण समोर आले आहेत. यातच दिलासादायक गोष्ट म्हणजे, आज तब्बल 4 हजार 161 करोनाबाधित ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “राज्यात आज 3,890 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 1,42,900वर पोहोचली आहे. आज नवीन 4,161 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 73,792 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 62,354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत”.

देशात पुन्हा लॉकडाउनची शक्यता -कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरू आहे. चेन्नई, नंतर गुवाहाटी आणि आता पश्चिम बंगालने लॉकडाउन लागूदेखील केला आहे. बेंगळुरूसह इतरही काही शहरे पुन्हा लॉकडाउनचा विचार करत आहेत. महानगरांमध्ये कोरोनाचा वेग वाढल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 4 लाख 50 हजारचा टप्पाही ओलांडला आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना तामिळनाडू सरकारने चेन्नै आणि जवळपासच्या तीन जिल्ह्यांत 30 जूनपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने गुवाहाटीच्या 11 नगर पालिका भागांत मंगलवारपासून 14 दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाउन -महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही कोरोनाने वेगाने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम बंगाल सरकारने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पश्चिम बंगालमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाउन लागू राहील. मात्र, लॉकडाउनमध्ये पूर्वीपेक्षा अधिक सूट देण्यात येईल, असेही ममता बॅनर्जी सरकारने म्हटले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: सर्दी-खोकल्याच्याही आधी दिसू शकतात कोरोनाची 'ही' अतिगंभीर लक्षणं, नव्या अभ्यासाचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार

मोदी सरकारनं पतंजलीच्या कोरोना औषधाची जाहिरात थांबवली, बाबा रामदेव म्हणाले...

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajesh Topeराजेश टोपे