CoronaVirus Lockdown : राज्यात लागणार कडक लॉकडाऊन; टास्क फोर्सची बैठक रविवारी, लवकरच निर्णय  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 04:11 AM2021-04-11T04:11:15+5:302021-04-11T07:04:49+5:30

CoronaVirus Lockdown : संसर्ग थांबवायचा तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, मात्र ते करताना कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिली.

CoronaVirus Lockdown: Strict lockdown in the state; Task force meeting on Sunday, decision soon | CoronaVirus Lockdown : राज्यात लागणार कडक लॉकडाऊन; टास्क फोर्सची बैठक रविवारी, लवकरच निर्णय  

CoronaVirus Lockdown : राज्यात लागणार कडक लॉकडाऊन; टास्क फोर्सची बैठक रविवारी, लवकरच निर्णय  

googlenewsNext

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत शनिवारी घेण्यात आला. लोकांचे जीव वाचविणे आवश्यक असल्याने लॉकडाऊन हवेच. मात्र हे करताना हातावर पोट असलेल्यांना कशा पद्धतीने मदत करायची, याचे सूत्र निश्चित केले जाणार आहे. संसर्ग थांबवायचा तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, मात्र ते करताना कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिली.

जवळपास अडीच तासांच्या या बैठकीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षांकडून अनेक सूचना करण्यात आल्या. अचानक लॉकडाऊन जाहीर करण्याऐवजी लोकांना विश्वासात घ्या, लॉकडाऊनचा रोड मॅप लोकांसमोर मांडा अन् मगच निर्णय घ्या, असा आग्रह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत धरला. मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यास सहमती दर्शविली. कष्टकऱ्यांना सरकारतर्फे काय दिलासा देता येईल याबाबत सोमवारी निर्णय घेऊ, असे पवार यांनी स्पष्ट केले. 

लॉकडाऊन १५ दिवसांचा?
कडक लॉकडाऊन आठ दिवसांचा असेल आणि नंतर गरजेनुसार तो एक आठवडा वाढविला जावा किंवा सुरुवातीलाच १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करावा, असे दोन पर्याय आहेत. 

अनर्थचक्र थांबवायचे तर निर्बंध अपरिहार्य : मुख्यमंत्री
तुम्ही त्याला लॉकडाऊन म्हणा की आणखी काही, पण कोरोनाने जे अनर्थचक्र राज्यावर ओढवले आहे. ते थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध लावावेच लागतील, या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत कडक लॉकडाऊनचे संकेत दिले.

Web Title: CoronaVirus Lockdown: Strict lockdown in the state; Task force meeting on Sunday, decision soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.