शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

CoronaVirus Live Updates : चिंताजनक आकडेवारी! राज्यात 56,286 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 32 लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 9:10 PM

CoronaVirus Live Updates Maharashtra : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.

मुंबई - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला असून दीड लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,26,789 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 685 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,66,862  लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाच कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 लाखांवर पोहोचला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 32,29,547 वर गेली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारी (8 एप्रिल) कोरोनाचे 56,286 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 376 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32,29,547 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा देखील वाढला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल 26 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 26,49,757रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

भारीच! कोरोना लस घेतल्यानंतर मोदी सरकार देणार 5000 रुपये; पण करावं लागणार 'हे' खास काम

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. वेगाने लसीकरण सुरू आहे. भारतात दर दिवशी सरासरी 30 लाख 93 हजार 861 जणांचं लसीकरण सुरू आहे. तर आतापर्यंत देशात 8 कोटी 70 लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. 

देशातील लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. अनेक कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत. केंद्र मोदी सरकारने देखील कोरोना लसीसकरणासंदर्भात देशपातळीवर एक स्पर्धा सुरू केली आहे. ज्यामध्ये कोरोना लस घेणाऱ्याला मोदी सरकार 5000 रुपये देणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी काही नियम आहेत तसेच प्रोसेस देखील आहे. केंद्र सरकारच्या mygov.in  या वेबसाईटवर या कोरोना लसीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धेत ती प्रत्येक व्यक्ती भाग घेऊ शकते, ज्या व्यक्तीने कोरोना लस घेतली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र