coronavirus vaccine photo contest you can win 5000 rupees know central government contest details | Corona Vaccine : भारीच! कोरोना लस घेतल्यानंतर मोदी सरकार देणार 5000 रुपये; पण करावं लागणार 'हे' खास काम

Corona Vaccine : भारीच! कोरोना लस घेतल्यानंतर मोदी सरकार देणार 5000 रुपये; पण करावं लागणार 'हे' खास काम

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. वेगाने लसीकरण सुरू आहे. भारतात दर दिवशी सरासरी 30 लाख 93 हजार 861 जणांचं लसीकरण सुरू आहे. तर आतापर्यंत देशात 8 कोटी 70 लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. 

देशातील लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. अनेक कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत. केंद्र मोदी सरकारने देखील कोरोना लसीसकरणासंदर्भात देशपातळीवर एक स्पर्धा सुरू केली आहे. ज्यामध्ये कोरोना लस घेणाऱ्याला मोदी सरकार 5000 रुपये देणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी काही नियम आहेत तसेच प्रोसेस देखील आहे. केंद्र सरकारच्या mygov.in  या वेबसाईटवर या कोरोना लसीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धेत ती प्रत्येक व्यक्ती भाग घेऊ शकते, ज्या व्यक्तीने कोरोना लस घेतली आहे. 

कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने कोरोना लस घेतल्यानंतर फक्त एक काम करावं लागणार आहे. कोरोना लस घेताना फोटो काढावा लागेल आणि त्यासोबत लसीकरणाचं महत्त्वं सांगणारी एक मस्त टॅगलाईन द्यावी लागेल. ज्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल. तुम्हाला mygov.in वेबसाइटवरील या लिंकवर लॉग इन करावं लागेल. त्यानंतर तिथे तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती भरा. तुमचा हा फोटो आणि टॅगलाईन पाठवा. सरकार या सर्व फोटो आणि टॅगलाइनमधून उत्तम असा फोटो आणि टॅगलाइनची निवड करेल. 

सरकारच्या वतीने 10 विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्यांना 5000 रुपये दिले जातील. 31 डिसेंबर 2021 पर्यंत तुम्ही या स्पर्धेसाठी अर्ज करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही याबाबतच एक ट्विट केलं आहे. कोरोना विरोधी लसीकरणात भारतानं अमेरिकेलाही मागे टाकून जगात अव्वल स्थान मिळवलं आहे, अशा आशयाचं ट्विट जावडेकर यांनी केलं आहे. आज सकाळी सात वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 8 कोटी 70 लाख 77 हजार 474 कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. 

English summary :
coronavirus vaccine photo contest you can win 5000 rupees know central government contest details

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus vaccine photo contest you can win 5000 rupees know central government contest details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.