शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: जिनोव्हाच्या कोरोना लसीची चाचणी वर्षाखेरीस; पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 07:36 IST

अमेरिकेतील सिअ‍ॅटेल येथील एचडीटी बायोटेक कॉर्पोरेशनच्या सहकार्याने जिनोव्हाकडून ही लस विकसित केली जात आहे.

पुणे : जिनोव्हा बायोफार्मा या कंपनीकडून कोरोनावर देशातील पहिली ‘एमआरएनए’वर आधारीत ‘एजीसी०१९’ ही लस विकसित केली जात आहे. वर्षअखेरीस या लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या लसीची २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात साठवणूक करता यावी, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लस प्रत्यक्षात आल्यानंतर त्याचे वितरण आणि साठवणूक शक्य होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन लसीच्या उत्पादनासह वितरण, चाचण्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला होता. तर, सोमवारी जिनोव्हा बायोफार्मा या कंपनीकडून तयार केल्या जात असलेल्या लसीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून माहिती घेतली.

अमेरिकेतील सिअ‍ॅटेल येथील एचडीटी बायोटेक कॉर्पोरेशनच्या सहकार्याने जिनोव्हाकडून ही लस विकसित केली जात आहे. हिंजवडीतील कंपनीच्या प्रयोगशाळेस शंभर देशांतील राजदुतांच्या भेटीचे नियोजनही सुरू आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, जिनोव्हाकडून वेगाने काम सुरू असून या लसीच्या मानवी चाचण्यांना वर्षअखेरीस सुरुवात होणार आहे. लवकर मान्यता मिळाल्यास त्याआधीही सुरुवात होऊ शकते.

भारतात विकसित होणाऱ्या बहुतेक लसी विषाणुतील प्रोटीन्सचा आधार असलेल्या आहेत. जिनोव्हाची लस ‘एमआरएनए’ वर आधारलेली आहे. या पध्दतीमुळे लस बनविण्याचा कालावधी अत्यंत कमी होऊ शकतो. त्याचे उत्पादनही वेगाने करता येऊ शकतो. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंग यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, ‘ही लस २ ते ८ अंश सेल्सिअस दरम्यान साठविता येऊ शकते. त्यादृष्टीने सुरुवातीपासूनच वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरू आहेत. 

कोरोनाच्या या लसीच्या चाचण्यांना केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने निधी दिला आहे. मानवी चाचण्यांना मान्यतेसाठी भारतीय नियामक संस्थेकडे परवानगी मागितली आहे. या चाचण्या मार्चपर्यंत पूर्ण होतील. ‘एमआरएनए’वर आधारलेल्या लसीच्या भारतातील या पहिल्या मानवी चाचण्या असतील.’ अशी माहिती सूत्रांकडून  देण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या