शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

corona virus : मधुमेह, उच्च रक्तदाब करतोय घात; ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावी काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 9:47 AM

चाळिशीच्या आतला एकही बळी नाही 

ठळक मुद्देपुण्यात सोमवारी खासगी रुग्णालयात ५२ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

राजानंद मोरे - पुणे : राज्यातील कोरोना विषाणूबाधित दहाव्या रुग्णाचा मृत्यू सोमवारी पुण्यात झाला. या नऊमधल्या जवळपास सगळ्यांनाच मधुमेह व उच्च रक्तदाब हे आजार होते.तसेच त्यातील सहा जणांचे वयसाठीच्या पुढे होते. यावरून मधुमेह,उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसह अन्य आजार असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींना मृत्यूचा धोका अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या अतिजोखमीच्या (हाय रिस्क) गटातील व्यक्तींनी अधिक दक्षता घेणे आवश्यकअसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.पुण्यात सोमवारी खासगी रुग्णालयात ५२ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला . या रुग्णाला आधीपासूनच मधुमेह व उच्च रक्तदाब होता. त्यातच कोरोना विषाणूची लागण झाल्याने त्यांची प्रकृतीअधिकच बिघडत गेली. अखेरकोरोनाच त्यांच्या मृत्यूला कारणीभूतठरला. राज्यात यापूर्वी झालेला आठ जणांचा मृत्यूही असाच झाला आहे.मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होता.त्यातील दोघांचे वय ४0 व ४५ आणिएकाचे ५२ वर्षे होते.कोरोना विषाणूमुळे जगभरात झालेल्या मृत्यूमध्ये ९0 टक्के  जणांना असे आजार होते. या आजारांमुळे त्यांच्यातील प्रतिकारशक्ती कमी झाल्याने ते बरे होऊ शकले नाहीत. आता तेच चित्र आपल्याकडेही दिसत आहे.याविषयी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, मधुमेह, उच्च रक्तदाब,हृदयरोग, एड्स, कर्करोगावर सुरूअसेल उपचार यासह इतर दुर्धर आजारामध्ये माणसाची प्रतिकारशक्ती खूप कमी होते. त्यामुळे त्यांच्या शरीरातील पेशी विषाणूंचा प्रतिकार करण्यास कमी पडतात. परिणामी त्यांच्यातील आजार बळावत जातो.गर्भवती महिलांनाही हा धोका असतो.त्यामुळे या सर्व व्यक्ती अतिजोखमीच्या गटात येतात.तसेच ६५ पेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिकही या गटात येतात. जगभरात हेच चित्र दिसून येत आहे. त्यासाठी या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. ............

राज्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांची स्थितीक्र.       वय                           आजार१.      ६४ (पुरुष)               उच्च रक्तदाब२.      ६३ (पुरुष)                  मधुमेह, उच्च                                      रक्तदाब, हृदयरोग३.    ६५ (पुरुष)              अनियंत्रित मधुमेह,                                        उच्च रक्तदाब४.    ६५ (महिला)              मधुमेह,                                          उच्च रक्तदाब५.   ६५ (महिला)               उच्च रक्तदाब६. ८५ (पुरुष)                    मधुमेह, पेसमेकर७. ४० (महिला)                  उच्च रक्तदाब८. ४५ (पुरुष)                      मधुमेह९. ५२ (पुरुष)                    मधुमेह, उच्च रक्तदाब१०. ७८ (पुरुष)                उच्च रक्तदाब, हृदयरोग..........जगातील ९0 टक्के कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू हे आधी कोणता ना कोणता आजार असल्याने झाले आहेत. आधी गंभीरआजार असल्यानंतर कोरोना विषाणूची लागण झाल्यास गुंतागूंत अधिक वाढत जाते. त्यामुळे मृत्यूची संख्या वाढते.राज्यातील झालेले हे मृत्यूही आधी आजार असलेल्या व्यक्तींचेच झाले आहेत.

- डॉ. प्रदीप आवटे,प्रमुख, राज्य साथरोग नियंत्रण विभाग

  

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यdiabetesमधुमेहCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHeart Diseaseहृदयरोग