शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

प्रेमवीराने प्रेयसीला भेटविण्याची गळ घातली; सोनू सुदने दिले खतरनाक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 17:19 IST

अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले.

मुंबई : बॉलिवूडच्या किंग खानांपेक्षा आजकाल देशभरात अभिनेता सोनू सूदचीच हवा जोरात सुरु झाली आहे. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी पाठविणे, त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करणे यामुळे सोनू सुद कमालीचा लोकप्रिय बनत चालला आहे. आज एका व्यक्तीने त्याच्याकडे अनोखीच मागणी केली. यावर सोनूने दिलेले उत्तर भाव खाऊन गेले आहे. 

अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले. सोनूच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर सोनू ट्रेंड करतोय. तर, कामगार वर्गाकडून व सेलिब्रिटींकडूनही सोनू सूदचं कौतुक होत आहे. विशेष म्हणजे बिहारमधील काही युवकांनी सोनू सूदचा पुतळा उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, ते पैसे गरिबांच्या मदतीसाठी वापरा असा रिप्लाय सोनूने दिला. आजपर्यंत ट्विटर अकाऊंटवर सोनूला टॅग करुन मदत मागितली जात होती. आता, सोनूने एक टोल फ्री नंबर जारी केला आहे. यावर फोन केलेल्यांना उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक किंवा इतर कुठल्याही राज्यात, संबंधित राज्य सरकारच्या परवानगीने पाठविण्यात येणार आहे. 

सोनू सुदचे हे काम पाहूने एका प्रेमवीराने सोनूकडे थेट प्रेयसीला भेटविण्याची मागणी केली. भावा! एकदा गर्लफ्रेंडला भेटव. बिहारलाच जायचे आहे. असे ट्वीट एका प्रेमवीराने सोनूला उद्देशून केले. यावर सोनूकडून आलेले उत्तर खतरनाक आहे. ''थोडे दिवस तिच्यापासून लांब राहून पहा, भावा. खऱ्या प्रेमाची परिक्षाही होऊन जाईल.'', असे उत्तर सोनूने या प्रेमवीराला दिले. यावर नेटकऱ्यांमध्ये कमालीचे हास्याचे फवारे उडाले. 

दरम्यान, माझ्या प्रिय बंधु व भगिनींनो, जर तुम्ही मुंबईत आहात आणि तुमच्या घरी जाऊ इच्छिता.  तर, कृपया या 18001213711 टोल फ्री नंबरवरुन आमच्याशी संपर्क साधा. तुम्ही किती लोकं आहात, कुठे आहात व कुठे जाऊ इच्छिता याबाबत माहिती द्या. माझी टीम तुम्हाला शक्य ती सर्वच मदत करेल, असे सोनूने ट्विट केले आहे. सोनूच्या या कामाचं बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने कौतुक केलं असून एका युजरने सोनू सूद सिंघमवाला काम कर रहे है.. अशा शब्दात सोनूचं कौतुक केलंय.   

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

धक्कादायक! चीनची कोरोनाविरोधावर मोठी चाल; दोन युद्धनौका तैवानच्या दिशेने रवाना

राष्ट्रपती राजवट: नारायण राणेंनी प्रतिक्रिया देणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना सुनावले

स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला

विशालहृदयी भारत! चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळने मदत मागितली; तत्काळ देऊ केली

चीनचा थरकाप उडणार! भारताची 18वी खतरनाक 'फ्लाइंग बुलेट' झेपावणार

 

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या