शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 08:42 IST

ही हत्या नैसर्गिक घटना असल्याचे भासवून तीन वर्ष उलटल्यानंतर पोलिसांच्या तपासामुळे वेगळे वळण मिळाले आहे.

पंकज पाटील

बदलापूर - बदलापूर पूर्वेतील एका इमारतीत १० जुलै २०२२ रोजी एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली होती. मात्र या घटनेची अधिक चौकशी केली असताना ही नैसर्गिक घटना नव्हे तर हत्येचा कट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीसह त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

ही हत्या नैसर्गिक घटना असल्याचे भासवून तीन वर्ष उलटल्यानंतर पोलिसांच्या तपासामुळे वेगळे वळण मिळाले आहे. बदलापूर पूर्वेतील उज्ज्वलदीप अपार्टमेंट येथे निरजा आंबेरकर या त्यांच्या पतीसोबत राहत होता. त्यांना १० जुलै २०२२ रोजी सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली होती. मात्र पोलिसांच्या तपासाने चक्रे फिरली आणि ही हत्या असल्याचे उघडकीस आले. 

निरजा आंबेरकर यांच्या मृत्यूप्रकरणात सुरू असलेल्या तपासात आरोपी ऋषीकेश चाळके याने स्वखुशीने एक निवेदन दिले. तसेच त्याबाबत गुन्हयाच्या ठिकाणी प्रात्यक्षिक करून दाखविले. सोबतच साक्षीदार हरिश घाडगे आणि दिपक वाघमारे यांनी याप्रकरणात जबाब दिले. यावरून आरोपीत ऋषीकेश चाळके, चेतन दुधाने, कुणाल चौधरी आणि पती रूपेश आंबेरकर यांनी आपसात कट रचला आणि निरजा रूपेश आंबेरकर यांना सर्पदंश करून जीवे ठार मारले असल्याची पोलिसांची खात्री झाली. त्यामुळे अकस्मात मृत्यूची खोटी माहिती देऊन गुन्ह्यातील पुरावे नष्ट केले आणि हत्येप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Husband arrested for wife's murder using venomous snake; plot uncovered.

Web Summary : A Badlapur man was arrested three years after his wife's death, initially ruled accidental. Police investigation revealed he conspired with friends to kill her using a venomous snake, staging it as a snake bite.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी