शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
3
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
4
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
5
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
6
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
7
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
8
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
9
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
10
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
11
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
12
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
13
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
14
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
15
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
16
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
18
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
19
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 09:48 IST

या विधेयकात आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ते ४९ टक्क्यांपर्यंत थेट परकीय गुंतवणुकीला (FDI) परवानगी मिळणार आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने SHANTI विधेयकाला मंजुरी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या विधेयकामुळे आता खासगी कंपन्यांना अणुऊर्जा क्षेत्रात पाऊल ठेवता येणार आहे. भारतासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे कारण २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जा क्षमता गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. SHANTI विधेयक म्हणजे 'सस्टेनेबल हार्नेसिंग एंड एडवांस्डमेंट ऑफ न्यूक्लियर एनर्जी फॉर ट्रांसफॉर्मिंग इंडिया' जे अणुऊर्जा प्रकल्प चालवणाऱ्यांना आवश्यक सुरक्षा प्रदान करेल.

SHANTI विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. हे विधेयक सिविल लायबिलिटी कायद्यात बदल करेल. याअंतर्गत प्रकल्प चालवणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि उपकरण पुरवठादारांची जबाबदारी देखील निश्चित केली जाईल. शिवाय प्रत्येक घटनेमागे ऑपरेटर विमा ₹१,५०० कोटीपर्यंत वाढवला जाईल, जो आता इंडियन न्यूक्लियर इन्शुरन्स पूल अंतर्गत येईल.

४९ टक्क्यापर्यंत परदेशी गुंतवणूक

या विधेयकात आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ते ४९ टक्क्यांपर्यंत थेट परकीय गुंतवणुकीला (FDI) परवानगी मिळणार आहे. हे अणुऊर्जेसाठी एकसमान कायदेशीर चौकट तयार करेल, ज्यामध्ये एका विशेष अणु न्यायाधिकरणाचा समावेश असेल. खासगी कंपन्यांना सरकारी देखरेखीखाली आणि स्पष्ट नियमांनुसार काम करण्याची परवानगी असेल. अणु सामग्रीचे उत्पादन, जड पाण्याचे उत्पादन आणि कचरा व्यवस्थापन यासारखी प्रमुख कामे अजूनही अणुऊर्जा विभागाच्या नियंत्रणाखाली राहतील.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सरकारच्या या प्लॅनची घोषणा करत अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करण्याचं म्हटलं होते. त्यांनी एक न्यूक्लियर एनर्जी मिशनची घोषणा केली होती. ज्यात छोट्या मॉड्यूलर रिएक्टरवर रिसर्च आणि डेवलपमेंटसाठी २० हजार कोटींची तरतूद केली होती. त्याशिवाय २०३३ पर्यंत ५ स्वदेशी SMT चालू करण्याची योजना असल्याचं सांगितले होते.

हे विधेयक अणुऊर्जा क्षेत्रासाठी खास का?

आतापर्यंत अणुऊर्जा कायद्यांतर्गत खासगी कंपन्या आणि राज्य सरकारे अणुऊर्जा प्रकल्प चालवू शकत नव्हत्या. सध्या केवळ न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL), DAE अंतर्गत एक सरकारी कंपनी देशातील सर्व २४ व्यावसायिक अणुभट्ट्यांचे संचालन करतात. शांती विधेयक अणुऊर्जेच्या सर्व क्षेत्रांमधील दीर्घकालीन चिंता दूर करण्यासाठी आणण्यात आले आहे. पुढील दोन दशकांत अणुऊर्जा क्षमता दहापट वाढवण्यासाठी खासगी कंपन्यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरेल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं. तर अणुऊर्जेचे दर अणुऊर्जा विभागाकडून निश्चित केले जातात, जे केंद्रीय वीज प्राधिकरणाशी सल्लामसलत करते. खासगी कंपन्यांच्या प्रवेशासाठी एक स्वतंत्र नियामक आवश्यक असेल जो स्पर्धात्मक आधारावर दर निश्चित करू शकेल असं डेलॉइट इंडियाचे भागीदार अनुजेश द्विवेदी म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : SHANTI Bill Approved: Private Sector Opens for Nuclear Energy in India

Web Summary : Central government approves SHANTI bill, opening nuclear energy to private sector. Aiming 100 GW by 2047, it allows 49% FDI, ensuring safety and insurance. This will boost nuclear capacity tenfold.
टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार