बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 21:55 IST2025-10-12T21:54:47+5:302025-10-12T21:55:46+5:30

Fraud Case:मॅटमध्ये आपल्या मुदतपूर्व बदलीला आव्हान देण्यासाठी बनावट कागदपत्रे जोडणाऱ्या पोलीस अमलदार विवेक जाधव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Cop Tries to Revoke Transfer Using Fabricated Documents in MAT, Naupada Police Register Fraud Case | बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणामध्ये (मॅट) आपल्या मुदतपूर्व बदलीला आव्हान देण्यासाठी बनावट कागदपत्रे जोडणाऱ्या पोलीस अमलदार विवेक जाधव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी रविवारी दिली. कर्तव्यात कसुरी केल्याने जाधव यांची नौपाडा पोलीस ठाणे ते मुख्यालय अशी मुदतपूर्व बदली झाली. याच बदलीला आव्हान देण्यासाठी त्यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला. याच दाव्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे जोडल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या पडताळणीमध्ये आढळले.

जाधव यांची नौपाडा पोलिस ठाण्यातून ठाणे शहर पोलिस मुख्यालयात १८ सप्टेंबर रोजी बदली झाली होती. त्यानुसार त्यांना पोलिस ठाण्यातून कार्यमुक्त केले होते. या बदलीविरोधात त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. त्याबाबतचे पत्र वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना ४ ऑक्टाेबर राेजी कुरिअरद्वारे प्राप्त झाले. जाधव यांनी मॅटमध्ये दावा केलेल्या कागदपत्रांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी पडताळणी केली. त्यात जाधव ६ ऑगस्ट रोजी त्यांच्या आजाराबाबत व त्यांच्यावर चालू असलेल्या औषधोपचाराबाबतची वैद्यकीय कागदपत्र पोलिस ठाण्यातील कर्तव्यावरील अधिकारी, तसेच अंमलदारांकडे दिल्याबाबत सही व शिक्का असलेले पत्रही सादर केल्याचे आढळले. 

५ ऑक्टोबर रोजी ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावरील इतर अधिकारी, तसेच अंमलदार यांना जाधव यांनी त्यांच्या औषधोपचाराचे कागदपत्र दिले होते का? दिले असतील तर त्याची माहिती आपल्याला का दिली नाही, अशी विचारणा महाजन यांनी केली. त्याचवेळी जाधव यांनी मॅट न्यायालयात सादर केलेल्या पत्रावर आपल्यापैकी कोणी सही व शिक्का दिला याचीही पडताळणी केली. यात अंमलदार यांच्या नावाचा शिक्का मारून त्यावर ६ ऑगस्ट रोजी कागदपत्र प्राप्त झाल्याची नौपाडा पोलीस ठाणे अंमलदारांची बनावट सही त्यांनीच केल्याचेही आढळले. न्यायाधिकरणाची त्यांनी दिशाभूल केल्याचे आढळल्याने त्यांच्याविरुद्ध १० ऑक्टोबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title : सिपाही का तबादला 'जुगाड़' विफल: जालसाजी से धोखाधड़ी का आरोप

Web Summary : एक पुलिस अधिकारी, विवेक जाधव पर तबादले को चुनौती देने के लिए जाली दस्तावेज जमा करने पर धोखाधड़ी का आरोप लगा है। उन पर महाराष्ट्र प्रशासनिक न्यायाधिकरण (MAT) को गुमराह करने के लिए जाली मेडिकल रिकॉर्ड बनाने का आरोप है। वरिष्ठ पुलिस निरीक्षण में जाधव का छल सामने आने पर उनके खिलाफ मामला दर्ज किया गया।

Web Title : Cop's Transfer 'Jugaad' Fails: Forgery Leads to Fraud Charges

Web Summary : A police officer, Vivek Jadhav, faces fraud charges for submitting forged documents to challenge his transfer. He allegedly fabricated medical records to mislead the Maharashtra Administrative Tribunal (MAT). Senior police inspection revealed Jadhav's deceit, leading to the filing of the case against him.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.