शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाचे सूप वाजले, सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग - विरोधकांची टीका

By admin | Updated: December 24, 2014 17:02 IST

प्रत्यक्ष रोख मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षात थांबलेल्या शेतक-यांच्या आत्महत्या पुन्हा सुरू झाल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

नागपूर, दि. २४ - राज्यातील शेतक-याबाबत सरकारच्या संवेदना संपल्याचे चित्र अधिवेशनातून पाहायला मिळाले असून प्रत्यक्ष रोख मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षात थांबलेल्या शेतक-यांच्या आत्महत्या पुन्हा सुरू झाल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप बुधवारी वाजले. त्यापार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही टीका करण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही यावेळी सरकारवर टीका केली.आघाडी सरकारने दुष्काळग्रस्त शेतक-यांना रोख ९ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. त्याबरोबरच इतर अनेक माध्यमातून दुष्काळमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याने  आत्महत्येचे सत्र गेल्या चार वर्षात थांबले होते. त्यावेळी सरकार आपल्या पाठिशी असल्याची जाणीव शेतक-याला होती अशी आठवणही विखे पाटील यांनी करुन दिली. केंद्रीय पथकाने शेतक-यांची थट्टा केली. तर दुसरीकडे कापूस उत्पादक शेतक-याच्या घरात कापूस आहे पण खरेदीकेंद्र सुरू करण्याबाबत अनास्था दाखवली जात आहे. दूध उत्पादक शेतक-याचीही उपेक्षा वाढली आहे. काहीही विचारले तर आम्ही केंद्राकडे मागणी केली असल्याचे उत्तर देऊन राज्य सरकार मोकळे होते. यावरुन  राज्य सरकार जनतेला मदत करण्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले, अशा शब्दांत विखे पाटील यांनी सरकारचा समाचार घेतला.