शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वाहतूकदारांना कंत्राट

By admin | Updated: October 7, 2015 02:51 IST

एसटी महामंडळाचे तोट्यातील मार्ग खासगी वाहतूकदारांना कंत्राटी पध्दतीने देण्याचा डाव शासनस्तरावर गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. त्याला खुद्द महामंडळ आणि एसटी संघटनेकडून

- सुशांत मोरे,  मुंबईएसटी महामंडळाचे तोट्यातील मार्ग खासगी वाहतूकदारांना कंत्राटी पध्दतीने देण्याचा डाव शासनस्तरावर गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. त्याला खुद्द महामंडळ आणि एसटी संघटनेकडून विरोध होत असतानाच आता पुन्हा एकदा तोट्यातील मार्ग खासगी वाहतूकदारांना देण्याचा निर्णय होत आहे. यावर एसटीकडून दोन महिन्यात अहवाल तयार करुन तो सार्वजनिक उपक्रम समितीला सादर करण्यात येणार आहे.सार्वजनिक उपक्रम समितीची बैठक २९ सप्टेंबर २0१५ रोजी पार पडली. या बैठकीला महालेखापालांचे प्रतिनिधींसह अतिरिक्ति मुख्य सचिव (परिवहन) गौतम चॅटर्जी, एसटी महामंडळाचे तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत एसटीच्या कामकाजावर चर्चा होतानाच प्रवासी भारमान कमी असलेले मार्ग म्हणजेच तोट्यातील मार्गांवर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा झाली. यात, भारमान कमी असलेल्या मार्गांवर प्रवाशांकडून एसटीचा वापर होत नसेल आणि अन्य पर्यायी वाहतूक साधनांचा वापर प्रवाशांकडून केला जात असेल तर एसटीने रॉयल्टी घेवून हे मार्ग खासगी वाहतूकदारांना देण्यात यावेत, अशी सूचना महामंडळाला केली. त्यामुळे महामंडळाचे उत्पन्न वाढू शकते. यावर एसटीचे तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक खंदारे यांनी कमी भारमान असलेल्या मार्गांचा अभ्यास करुन दोन ते तीन महिन्यात अहवाल सादर करू अशी माहिती दिली होती. सध्या महामंडळाकडून अशा मार्र्गांचा अभ्यास करण्याचे काम सुरु असून लवकरच अहवालही सादर केला जाणार आहे. त्यामुळे एसटीच्या या मार्र्गांवर खाजगी वाहतूकदारांची वाहने धावण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे एसटीतील सूत्रांनी सांगितले. याबाबत अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) गौतम चॅटजी यांनी सांगितले की, एसटीचे पूर्वी ७५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी होते. आता हीच संख्या ६७ लाखांपर्यंत आली आहे. हे पाहता त्यांनी प्रवासी आणि उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. तोट्यातील मार्ग खासगी वाहतूकदारांना देण्याबाबत एसटी महामंडळाकडून अहवाल सादर केला जाणार आहे. धोरण आखावे : एसटी युनियनचा विरोधसर्वसमावेशक वाहतूक धोरण एसटीकडे नसल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत असल्याचीही चर्चा या बैठकीत झाली. त्यामुळे महामंडळाने धोरण आखावे अशी सूचनाही केली गेली होती. आघाडी सरकारच्या काळातही एसटीचे तोट्यातील मार्ग हे खाजगी वाहतूकदारांना देण्याचा प्रयत्न सुरु होता. त्याला त्यावेळी एसटी महामंडळ आणि एसटीच्या युनियनकडून विरोध करण्यात आला होता. त्यामुळे हा विषय मागे पडला. आता पुन्हा एकदा या विषयाने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे