शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बांधकाम क्षेत्रात होणार घसघशीत वाढ; नव्या ‘डीसीआर’मुळे जादा एफएसआय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 2:28 AM

सुधारित नियमावली मंजूर झाल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिली. विधान परिषद निवडणुकीनंतर ती लागू होईल.

संदीप शिंदे

मुंबई : विद्यमान विकास नियंत्रण नियमावलीनुसार (डीसीआर) टीडीआर, प्रिमियमच्या सवलती घेत कमीत कमी १.१५ आणि जास्तीत जास्त २.५५ चटई क्षेत्र निर्देशांकानुसार (एफएसआय) बांधकाम करता येत होते. मात्र, नव्या युनिफाईड डीसीआरमधिल सुधारित तरतुदीनुसार ही मर्यादा १.६० ते ३ पर्यंत वाढणार आहे. ‘अँन्सिलरी एफएसआय’सुध्दा बहाल केला जाणार आहे. त्यामुळे सध्या अनुज्ञेय असलेल्या बांधकामापेक्षा किमान ३० ते ३५ टक्के जादा बांधकाम करण्याची परवानगी विकासकांना मिळेल अशी माहिती नगरविकास विभागातल्या विश्वसनीय सुत्रांकडून हाती आली आहे.

सुधारित नियमावली मंजूर झाल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिली. विधान परिषद निवडणुकीनंतर ती लागू होईल. विद्यमान प्रचलित नियमालींमध्ये एफएसआयमध्ये वाढ झाली आहे. सध्या मुंबई वगळता उर्वरित सर्व महापालिकांमध्ये बेस एफएसआय एक असून आरजीचे क्षेत्र वगळल्यास तो ०.८५ इतकाच होते. या बांधकामांना २०१६ सालच्या मंजूर धोरणानुसार रस्त्याच्या रुंदीनुसार टीडीआर मिळतो. त्याशिवाय ०.३३ टक्के प्रिमियम एफएसआय घेण्याची तरतूद आहे. वेगवेगळ्या पालिकांमध्ये बाल्कनी, जीना आदी क्षेत्र प्रिमियम आकारून देण्याची मुभा आहे. या परवानग्यांसाठी वापरली जाणारी स्वतंत्र नियमावली हद्दपार झाली आहे. 

किमती नियंत्रणात ठराविक जमिनीवर जास्त बांधकाम करण्याची मुभा मिळाल्याने विकासकांच्या प्रकल्प खर्चात कपात होईल. कमी जागेत जास्त घरांची उभारणी शक्य होईल. त्यामुळे घरांच्या किंमती नियंत्रणात राहतील. पर्यायाने आवाक्याबाहेर जात असलेले गृह खरेदीचे स्वप्न साकार करणे अनेक कुटुंबांना शक्य होईल अशी भूमिका एफएसआय वाढीमागे असल्याचे समजते. मात्र, या सवलतीचा फायदा विकासकच लाटतात की सर्वसामान्यांनाही त्याची फळे चाखता येतात हे येणा-या काही वर्षांत स्पष्ट होईल.